S M L

बेस्ट कर्मचार्‍यांचा बोनसचा प्रश्न अधांतरी

29 नोव्हेंबरबेस्टच्या कर्मचार्‍यांना दिवाळीत देण्यात येणारं सानुग्रह अनुदान नोव्हेंबर महिन्याच्या पगारातही मिळणार नसल्याची भूमिका बेस्टचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी मांडली आहे. बेस्टच्या चाळीस हजार कर्मचार्‍यांना देण्यात येणारं अनुदान नेमकं कधी आणि किती द्यायचं याचा निर्णय घेण्यासाठी 14 डिसेंबरनंतर बैठक बोलवण्यात येणार आहे. बेस्टचे जनरल मॅनेजर ओ पी गुप्ता हे गुजरात निवडणुकीच्या कामानिमित्त बाहेरगावी गेल्यामुळे बेस्टच्या चाळीस हजार कर्मचार्‍यांच्या सानुग्रह अनुदानाचा प्रश्न अधांतरीच राहिला आहे. यंदाच्या वर्षी बेस्टची आर्थिक अवस्था आणखीच बिकट झाली. दिवाळीच्या अगोदर बेस्टला पालिकेनं 1600 कोटींचं कर्ज घेतलं आहे. अगोदरच कर्जात बुडालेल्यामुळे बेस्टने बोनस देण्यासाठी टाळाटाळ सुरु केली. मात्र कर्मचारी संघटनेनं बोनस देण्याची मागणी लावून धरली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2012 03:53 PM IST

बेस्ट कर्मचार्‍यांचा बोनसचा प्रश्न अधांतरी

29 नोव्हेंबर

बेस्टच्या कर्मचार्‍यांना दिवाळीत देण्यात येणारं सानुग्रह अनुदान नोव्हेंबर महिन्याच्या पगारातही मिळणार नसल्याची भूमिका बेस्टचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी मांडली आहे. बेस्टच्या चाळीस हजार कर्मचार्‍यांना देण्यात येणारं अनुदान नेमकं कधी आणि किती द्यायचं याचा निर्णय घेण्यासाठी 14 डिसेंबरनंतर बैठक बोलवण्यात येणार आहे. बेस्टचे जनरल मॅनेजर ओ पी गुप्ता हे गुजरात निवडणुकीच्या कामानिमित्त बाहेरगावी गेल्यामुळे बेस्टच्या चाळीस हजार कर्मचार्‍यांच्या सानुग्रह अनुदानाचा प्रश्न अधांतरीच राहिला आहे. यंदाच्या वर्षी बेस्टची आर्थिक अवस्था आणखीच बिकट झाली. दिवाळीच्या अगोदर बेस्टला पालिकेनं 1600 कोटींचं कर्ज घेतलं आहे. अगोदरच कर्जात बुडालेल्यामुळे बेस्टने बोनस देण्यासाठी टाळाटाळ सुरु केली. मात्र कर्मचारी संघटनेनं बोनस देण्याची मागणी लावून धरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2012 03:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close