S M L

भाजपने बजावली जेठमलानींना कारणे दाखवा नोटीस

26 नोव्हेंबरभाजपचे खासदार राम जेठमलानीबाबत भाजपनं कडक भूमिका घेतली आहे. जेठमलानी यांना आज कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना पक्षातून का काढून टाकू नये अशी विचारणा पक्षानं केलीय. या नोटीशीला राम जेठमलानी यांना 10 दिवसात उत्तर द्यायचंय. जेठमलानी यांनी पूर्ती गैरव्यवहाराच्या आरोपांवरून पक्षाध्यक्ष नितीन गडकरींचा राजीनामा मागितला होता. त्यानंतर सीबीआय संचालकांच्या नियुक्तीवर भाजपनं घेतलेल्या भूमिकेलाही त्यांनी विरोध केला होता. याची किंमत त्यांना चुकवावी लागली. त्यांना काल पक्षातून निलंबित करण्यात आलं, तर आज कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2012 05:54 PM IST

भाजपने बजावली जेठमलानींना कारणे दाखवा नोटीस

26 नोव्हेंबर

भाजपचे खासदार राम जेठमलानीबाबत भाजपनं कडक भूमिका घेतली आहे. जेठमलानी यांना आज कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना पक्षातून का काढून टाकू नये अशी विचारणा पक्षानं केलीय. या नोटीशीला राम जेठमलानी यांना 10 दिवसात उत्तर द्यायचंय. जेठमलानी यांनी पूर्ती गैरव्यवहाराच्या आरोपांवरून पक्षाध्यक्ष नितीन गडकरींचा राजीनामा मागितला होता. त्यानंतर सीबीआय संचालकांच्या नियुक्तीवर भाजपनं घेतलेल्या भूमिकेलाही त्यांनी विरोध केला होता. याची किंमत त्यांना चुकवावी लागली. त्यांना काल पक्षातून निलंबित करण्यात आलं, तर आज कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2012 05:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close