S M L

'गोर्‍यासाहेबां'ची आघाडी ;भारत बॅकफूटवर

07 डिसेंबरकोलकाता टेस्ट मॅचवर पाहुण्या इंग्लंडनं मजबूत पकड मिळवली आहे. कॅप्टन कुकची दीडशतकी खेळी आणि प्रमुख बॅट्समनच्या हाफसेंच्युरीच्या जोरावर इंग्लंडनं पहिल्या इनिंगमध्ये 6 विकेट गमावत 509 रन्स केलेत आणि पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 193 रन्सची आघाडी घेतली आहेत. दुसर्‍या दिवसअखेर 1 विकेट गमावत 216 रन्स करणार्‍या इंग्लंडनं आज तिसर्‍या दिवसावर संपूर्णपणे वर्चस्व गाजवलं. दुसरी विकेट घेण्यासाठी भारताला तब्बल 66 ओव्हर्स वाट पहावी लागली. कॅप्टन कुकला दोन जीवदान मिळाले आणि याचा फायदा उचलत त्यानं तब्बल 190 रन्स केले. तर निक कॉम्प्टन, जोनाथन ट्रॉट आणि केविन पीटरसन या आघाडीच्या बॅट्समननं हाफसेंच्युरी केल्या. मॅचचे अजून 2 दिवस बाकी असून मुंबई टेस्टप्रमाणेच कोलकाता टेस्टमध्ये भारतीय टीमवर इनिंगनं पराभवाचं सावट पसरलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2012 12:46 PM IST

'गोर्‍यासाहेबां'ची आघाडी ;भारत बॅकफूटवर

07 डिसेंबर

कोलकाता टेस्ट मॅचवर पाहुण्या इंग्लंडनं मजबूत पकड मिळवली आहे. कॅप्टन कुकची दीडशतकी खेळी आणि प्रमुख बॅट्समनच्या हाफसेंच्युरीच्या जोरावर इंग्लंडनं पहिल्या इनिंगमध्ये 6 विकेट गमावत 509 रन्स केलेत आणि पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 193 रन्सची आघाडी घेतली आहेत. दुसर्‍या दिवसअखेर 1 विकेट गमावत 216 रन्स करणार्‍या इंग्लंडनं आज तिसर्‍या दिवसावर संपूर्णपणे वर्चस्व गाजवलं. दुसरी विकेट घेण्यासाठी भारताला तब्बल 66 ओव्हर्स वाट पहावी लागली. कॅप्टन कुकला दोन जीवदान मिळाले आणि याचा फायदा उचलत त्यानं तब्बल 190 रन्स केले. तर निक कॉम्प्टन, जोनाथन ट्रॉट आणि केविन पीटरसन या आघाडीच्या बॅट्समननं हाफसेंच्युरी केल्या. मॅचचे अजून 2 दिवस बाकी असून मुंबई टेस्टप्रमाणेच कोलकाता टेस्टमध्ये भारतीय टीमवर इनिंगनं पराभवाचं सावट पसरलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2012 12:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close