S M L

इंदू मिलबाबत बुधवारी घोषणा

04 डिसेंबरराज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याबाबत 5 डिसेंबरला संसदेत घोषणा करण्याचं आश्वासन केंद्रीय वस्त्रद्योग मंत्री आनंद शर्मा यांनी अगोदरच दिलं होतं त्यानुसार आज दिल्लीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. उद्या संसदेत आनंद शर्मा याबाबत घोषणा करणार आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची संपूर्ण साडेबारा एकरची जागा देण्यात यावी या मागणीसाठी मागिल वर्षी 6 डिसेंबरला आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भिमसैनिकांनी इंदू मिल ताब्यात घेतली होती. सात दिवस चाललेल्या आंदोलनला राज्य सरकारने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. पण आम्ही आमच्या मागणीवर ठाम असल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. मात्र आश्वासन देऊन सुद्धा राज्य सरकारकडून इंदू मिलबाबत दिरंगाई होतं असल्यामुळे दलित संघटनांनी राज्यभरात आंदोलनं केली. रिपाईचे नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आलं होतं. तर वस्त्रद्योग मंत्री आनंद शर्मा यांच्याकडे राज्य सरकारने जमीन देण्याबाबत मागणी केली होती. मध्यतंरी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुंबई दौर्‍यावर असताना स्मारकासाठी लवकरच जागा देणार असल्याचं संकेत दिले होते. मात्र वर्षउलटून सुद्धा कोणत्याच हालचाली होतं नसल्यामुळे रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी येत्या 6 डिसेंबरच्या स्मारकासाठी जागा देण्यात यावी अन्यथा मिलवर कब्जा केला जाईल असा इशारा दिला होता. गुरुवारी दिल्लीत आठवले यांच्या नेतृत्वाखाली जंतरमंतर मैदानावर आंदोलन करण्यात आलं होतं. आज रामदास आठवले यांनी कृषीमंत्री शरद पवार आणि केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, आनंद शर्मा यांच्यासोबत बैठक झाली. अखेर ही बैठकीत निर्णायक ठरली. येत्या 4 किंवा 5 डिसेंबरला संसदेत इंदू मिलची जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात येईल अशी माहिती खुद्द रामदास आठवले यांनी दिली होती. या घोषणेमुळे एकाप्रकार दलित संघटनेच्या वर्षभराच्या आंदोलनला यश मिळलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2012 03:34 PM IST

इंदू मिलबाबत बुधवारी घोषणा

04 डिसेंबर

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याबाबत 5 डिसेंबरला संसदेत घोषणा करण्याचं आश्वासन केंद्रीय वस्त्रद्योग मंत्री आनंद शर्मा यांनी अगोदरच दिलं होतं त्यानुसार आज दिल्लीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. उद्या संसदेत आनंद शर्मा याबाबत घोषणा करणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची संपूर्ण साडेबारा एकरची जागा देण्यात यावी या मागणीसाठी मागिल वर्षी 6 डिसेंबरला आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भिमसैनिकांनी इंदू मिल ताब्यात घेतली होती. सात दिवस चाललेल्या आंदोलनला राज्य सरकारने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. पण आम्ही आमच्या मागणीवर ठाम असल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. मात्र आश्वासन देऊन सुद्धा राज्य सरकारकडून इंदू मिलबाबत दिरंगाई होतं असल्यामुळे दलित संघटनांनी राज्यभरात आंदोलनं केली. रिपाईचे नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आलं होतं. तर वस्त्रद्योग मंत्री आनंद शर्मा यांच्याकडे राज्य सरकारने जमीन देण्याबाबत मागणी केली होती. मध्यतंरी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुंबई दौर्‍यावर असताना स्मारकासाठी लवकरच जागा देणार असल्याचं संकेत दिले होते. मात्र वर्षउलटून सुद्धा कोणत्याच हालचाली होतं नसल्यामुळे रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी येत्या 6 डिसेंबरच्या स्मारकासाठी जागा देण्यात यावी अन्यथा मिलवर कब्जा केला जाईल असा इशारा दिला होता. गुरुवारी दिल्लीत आठवले यांच्या नेतृत्वाखाली जंतरमंतर मैदानावर आंदोलन करण्यात आलं होतं. आज रामदास आठवले यांनी कृषीमंत्री शरद पवार आणि केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, आनंद शर्मा यांच्यासोबत बैठक झाली. अखेर ही बैठकीत निर्णायक ठरली. येत्या 4 किंवा 5 डिसेंबरला संसदेत इंदू मिलची जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात येईल अशी माहिती खुद्द रामदास आठवले यांनी दिली होती. या घोषणेमुळे एकाप्रकार दलित संघटनेच्या वर्षभराच्या आंदोलनला यश मिळलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2012 03:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close