S M L

राज्यावर 2 लाख 70 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर

07 डिसेंबरएकीकडे राज्यात 'व्हाईट'पत्रिका काढून कोणताच घोटाळा झालं नाही असं दाखवलं जात आहे तर दुसरीकडे राज्यावर कर्जाचा डोंगर 2 लाख 70 हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळं या वर्षी राज्य सरकारनं काढलेलं 7 हजार 580 कोटींचं कर्ज हे कर्जाची मुद्दल आणि व्याज फेडण्यातच गेलंय अशी धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. इतकंच नाही तर थोड्याच दिवसांमध्ये आणखी सुमारे 10 हजार कोटींचं कर्ज राज्य सरकार काढणार आहे. त्यामुळं राज्य सरकारची कर्जात दिवाळी सुरू असल्याची टीका होतेय.माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रानुसार, चालू वर्षांत म्हणजे 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारनं एकूण 7 हजार 580 कोटी रुपये कर्ज काढलं. त्यापैकी 7 हजार कोटींचं कर्ज पावणे नऊ टक्के दरानं खुल्या बाजारातून काढलं. तसंच नाबार्डकडून 189 कोटी रुपये आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून तब्बल पावणे 14 टक्के दरानं 86 कोटी रुपयांचं कर्ज काढण्यात आलं. याशिवाय केंद्र सरकारकडून साडे नऊ टक्के दरानं 303 कोटी रुपयांचं कर्ज काढण्यात आलं. विशेष म्हणजे काढलेलं कर्ज हे राज्याच्या एकूण कर्जाची मुद्दल आणि व्याजाची परतफेड करण्यातच खर्ची झाले. याचाच अर्थ चालू वर्षात आता पर्यंत 7 हजार 580 कोटी रुपयाचं कर्ज काढलं गेलं. पण या रकमेतून एकूण कर्जाची मुद्दल आणि व्याजापोटी 7 हजार 619 कोटी रुपयांची परतफेड करण्यात आली. आता तर कर्जाच्या वाढत्या प्रमाणामुळं राज्य सरकारची क्रेडिट रेटिंग पूर्णपणे घसरलीय. त्यामुळं रिझर्व्ह बँकेच्या रोख्यांच्या लिलावातून चढ्या दराने कर्ज राज्य सरकारला घ्यावे लागणार आहे. या महिन्या अखेर आणखी 10 हजार कोटी रुपयांचं कर्ज राज्य सरकार काढणार आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर- चालू वर्षांत म्हणजे 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारनं एकूण 7 हजार 580 कोटी रुपये कर्ज काढलं- त्यापैकी 7 हजार कोटींचं कर्ज पावणे नऊ टक्के दरानं खुल्या बाजारातून काढलं- तसंच नाबार्डकडून 189 कोटी रुपये आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून तब्बल पावणे 14 टक्के दरानं 86 कोटी रुपयांचं कर्ज काढण्यात आलं- याशिवाय केंद्र सरकारकडून साडे नऊ टक्के दरानं 303 कोटी रुपयांचं कर्ज काढण्यात आलं- विशेष म्हणजे काढलेलं कर्ज हे राज्याच्या एकूण कर्जाच्या व्याजाची परतफेड करण्यातच खर्ची झाले

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2012 02:08 PM IST

राज्यावर 2 लाख 70 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर

07 डिसेंबर

एकीकडे राज्यात 'व्हाईट'पत्रिका काढून कोणताच घोटाळा झालं नाही असं दाखवलं जात आहे तर दुसरीकडे राज्यावर कर्जाचा डोंगर 2 लाख 70 हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळं या वर्षी राज्य सरकारनं काढलेलं 7 हजार 580 कोटींचं कर्ज हे कर्जाची मुद्दल आणि व्याज फेडण्यातच गेलंय अशी धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. इतकंच नाही तर थोड्याच दिवसांमध्ये आणखी सुमारे 10 हजार कोटींचं कर्ज राज्य सरकार काढणार आहे. त्यामुळं राज्य सरकारची कर्जात दिवाळी सुरू असल्याची टीका होतेय.

माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रानुसार, चालू वर्षांत म्हणजे 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारनं एकूण 7 हजार 580 कोटी रुपये कर्ज काढलं. त्यापैकी 7 हजार कोटींचं कर्ज पावणे नऊ टक्के दरानं खुल्या बाजारातून काढलं. तसंच नाबार्डकडून 189 कोटी रुपये आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून तब्बल पावणे 14 टक्के दरानं 86 कोटी रुपयांचं कर्ज काढण्यात आलं. याशिवाय केंद्र सरकारकडून साडे नऊ टक्के दरानं 303 कोटी रुपयांचं कर्ज काढण्यात आलं. विशेष म्हणजे काढलेलं कर्ज हे राज्याच्या एकूण कर्जाची मुद्दल आणि व्याजाची परतफेड करण्यातच खर्ची झाले. याचाच अर्थ चालू वर्षात आता पर्यंत 7 हजार 580 कोटी रुपयाचं कर्ज काढलं गेलं. पण या रकमेतून एकूण कर्जाची मुद्दल आणि व्याजापोटी 7 हजार 619 कोटी रुपयांची परतफेड करण्यात आली. आता तर कर्जाच्या वाढत्या प्रमाणामुळं राज्य सरकारची क्रेडिट रेटिंग पूर्णपणे घसरलीय. त्यामुळं रिझर्व्ह बँकेच्या रोख्यांच्या लिलावातून चढ्या दराने कर्ज राज्य सरकारला घ्यावे लागणार आहे. या महिन्या अखेर आणखी 10 हजार कोटी रुपयांचं कर्ज राज्य सरकार काढणार आहे.

राज्यावर कर्जाचा डोंगर

- चालू वर्षांत म्हणजे 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारनं एकूण 7 हजार 580 कोटी रुपये कर्ज काढलं- त्यापैकी 7 हजार कोटींचं कर्ज पावणे नऊ टक्के दरानं खुल्या बाजारातून काढलं- तसंच नाबार्डकडून 189 कोटी रुपये आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून तब्बल पावणे 14 टक्के दरानं 86 कोटी रुपयांचं कर्ज काढण्यात आलं- याशिवाय केंद्र सरकारकडून साडे नऊ टक्के दरानं 303 कोटी रुपयांचं कर्ज काढण्यात आलं- विशेष म्हणजे काढलेलं कर्ज हे राज्याच्या एकूण कर्जाच्या व्याजाची परतफेड करण्यातच खर्ची झाले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2012 02:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close