S M L

अजित पवारांचं कमबॅक लांबणीवर ?

30 नोव्हेंबरराष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचं मंत्रिमंडळातील कमबॅक लांबणीवर पडलंय. अजित पवारांना मंत्रिमंडळात घेण्याबाबत कोणताही निर्णय तूर्तास होणार नाही असं खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. तसंच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार संसद आणि नागपूर अधिवेशनानंतर केला जाईल अशा सूचनाही शरद पवार यांनी राज्यातल्या नेत्यांना केल्या आहेत. तर श्वेतपत्रिका सादर होण्यापूर्वीच अजित पवारांना मंत्रिमंडळात घेण्याची मागणी नवाब मलिका यांनी केली होती. तसंच काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट देऊन मोकळे झाले होते त्याची दखल घेत शरद पवारांनी मलिकांच्या विधानांवरही नाराजी व्यक्त केली आहे. सिंचन श्वेतपत्रिकेमुळे अजित पवारांना क्लीन चिट मिळाल्याचं वातावरण तयार झाल्यानंतर शरद पवारांनी राज्यातल्या नेत्यांना ह्या सूचना केल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 30, 2012 09:37 AM IST

अजित पवारांचं कमबॅक लांबणीवर ?

30 नोव्हेंबर

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचं मंत्रिमंडळातील कमबॅक लांबणीवर पडलंय. अजित पवारांना मंत्रिमंडळात घेण्याबाबत कोणताही निर्णय तूर्तास होणार नाही असं खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. तसंच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार संसद आणि नागपूर अधिवेशनानंतर केला जाईल अशा सूचनाही शरद पवार यांनी राज्यातल्या नेत्यांना केल्या आहेत. तर श्वेतपत्रिका सादर होण्यापूर्वीच अजित पवारांना मंत्रिमंडळात घेण्याची मागणी नवाब मलिका यांनी केली होती. तसंच काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट देऊन मोकळे झाले होते त्याची दखल घेत शरद पवारांनी मलिकांच्या विधानांवरही नाराजी व्यक्त केली आहे. सिंचन श्वेतपत्रिकेमुळे अजित पवारांना क्लीन चिट मिळाल्याचं वातावरण तयार झाल्यानंतर शरद पवारांनी राज्यातल्या नेत्यांना ह्या सूचना केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2012 09:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close