S M L

'शिवाजी पार्कचं नामांतर शिवतीर्थ करूनच दाखवू'

10 डिसेंबरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक भाषणांमधून शिवाजी पार्कचा आत्मयीतेनं उल्लेख शिवतीर्थ असा केलाय. त्यामागे बाळासाहेब आणि शिवतीर्थ असं एक अतूट नातं होतं. त्यामुळे शिवाजी पार्कचे नामांतर शिवतीर्थ व्हावे यासाठी बहुमताच्या जोरावर शिवाजी पार्कचं नाव शिवतीर्थ करूच असा आक्रमक पवित्रा मुंबई महापालिकेचे महापौर सुनील प्रभू यांनी घेतला आहे. तर ज्यांनी कोणी विरोध केला त्यांना महाराष्ट्राचा आणि शिवाजी पार्कचा इतिहास माहित नाही. या काँग्रेस सरकारने नेहमी विरोधात भूमिका घेतली आहे पण शिवाजी महाराज आणि शिवतीर्थ हा समानअर्थी शब्द आहे असं सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रभूंची पाठराखण केली आहे. मात्र नामांतराला मनसेनं विरोध दर्शवला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आपल्या लाडक्या नेत्याच्या स्मरणात शिवाजी पार्कवर स्मारक उभारण्याची मागणी शिवसेना नेत्यांनी लावून धरली. पण अनेक वादा-विवादानंतर अखेर ती मावळली. स्मारकाचा प्रश्न मार्गी लागण्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवाजी पार्क समाधीस्थळ व्हावेत अशी मागणी केली. आज मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत शिवाजी पार्कला शिवतीर्थ हे नाव देण्यात यावं असा प्रस्ताव शिवसेनेनं मांडणार आहेत. पण स्थायी समितीच्या बैठकीमध्ये काँग्रेस आणि मनसेनं या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. नामांतरामुळे कोणताही विकास होतं नाही. भावनिकतेच्या मुद्दावर राजकारण केलं जातं आहे अशी टीका मनसेचे नगरसेवकांनी केला आहे. मात्र विरोधाला बगल देत महापौर सुनील प्रभू यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. बाळासाहेब आणि शिवाजी पार्क यांचं नात अतूट होतं. बाळासाहेबांनी अनेक भाषणामधून शिवाजी पार्कचा उल्लेख शिवतीर्थ असा केलाय. त्यामुळे शिवाजी पार्कचे नामांतर शिवतीर्थ व्हावे अशी आमची मागणी आहे यासाठी बहुमताच्या जोरावर शिवतीर्थ करूनच दाखवू असा आक्रमक पवित्रा प्रभू यांनी घेतला आहे. कोणत्याही विकास योजनेला मंजुरी देण्यासाठी बहुमताची गरज असते पण विरोधक विरोध करतच राहतात आम्ही लोकशाही पद्धतीनेच हा प्रस्ताव मंजूर करू असं ही प्रभू यांनी सांगितलं. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही प्रभू यांना पाठिंबा दिला आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाचा विषय हा कायदा,अटीच्या पलीकडचा आहे. लाखो शिवसैनिकांच्या भावनेचा हा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारसोबत आम्ही चर्चा करत आहोत भावनेला महत्व देऊनच मार्ग निघेल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कारासाठी सेनेला शिवाजी पार्क एका दिवसासाठी देण्यात आलं होतं. पण कालावधी उलटून सुद्धा सेनेकडून शिवाजी पार्कवर तयार करण्यात आलेला चौथारा हटवण्यात आला नाही. याबद्दल राज्य सरकारने मुंबईचे महापौर सुनील प्रभू आणि संजय राऊत यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र मागिल तीन दिवसांपासून शिवसैनिकांनी चौथार्‍याभोवती सुरक्षाकडं उभारलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2012 10:54 AM IST

'शिवाजी पार्कचं नामांतर शिवतीर्थ करूनच दाखवू'

10 डिसेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक भाषणांमधून शिवाजी पार्कचा आत्मयीतेनं उल्लेख शिवतीर्थ असा केलाय. त्यामागे बाळासाहेब आणि शिवतीर्थ असं एक अतूट नातं होतं. त्यामुळे शिवाजी पार्कचे नामांतर शिवतीर्थ व्हावे यासाठी बहुमताच्या जोरावर शिवाजी पार्कचं नाव शिवतीर्थ करूच असा आक्रमक पवित्रा मुंबई महापालिकेचे महापौर सुनील प्रभू यांनी घेतला आहे. तर ज्यांनी कोणी विरोध केला त्यांना महाराष्ट्राचा आणि शिवाजी पार्कचा इतिहास माहित नाही. या काँग्रेस सरकारने नेहमी विरोधात भूमिका घेतली आहे पण शिवाजी महाराज आणि शिवतीर्थ हा समानअर्थी शब्द आहे असं सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रभूंची पाठराखण केली आहे. मात्र नामांतराला मनसेनं विरोध दर्शवला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर आपल्या लाडक्या नेत्याच्या स्मरणात शिवाजी पार्कवर स्मारक उभारण्याची मागणी शिवसेना नेत्यांनी लावून धरली. पण अनेक वादा-विवादानंतर अखेर ती मावळली. स्मारकाचा प्रश्न मार्गी लागण्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवाजी पार्क समाधीस्थळ व्हावेत अशी मागणी केली. आज मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत शिवाजी पार्कला शिवतीर्थ हे नाव देण्यात यावं असा प्रस्ताव शिवसेनेनं मांडणार आहेत. पण स्थायी समितीच्या बैठकीमध्ये काँग्रेस आणि मनसेनं या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. नामांतरामुळे कोणताही विकास होतं नाही. भावनिकतेच्या मुद्दावर राजकारण केलं जातं आहे अशी टीका मनसेचे नगरसेवकांनी केला आहे.

मात्र विरोधाला बगल देत महापौर सुनील प्रभू यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. बाळासाहेब आणि शिवाजी पार्क यांचं नात अतूट होतं. बाळासाहेबांनी अनेक भाषणामधून शिवाजी पार्कचा उल्लेख शिवतीर्थ असा केलाय. त्यामुळे शिवाजी पार्कचे नामांतर शिवतीर्थ व्हावे अशी आमची मागणी आहे यासाठी बहुमताच्या जोरावर शिवतीर्थ करूनच दाखवू असा आक्रमक पवित्रा प्रभू यांनी घेतला आहे. कोणत्याही विकास योजनेला मंजुरी देण्यासाठी बहुमताची गरज असते पण विरोधक विरोध करतच राहतात आम्ही लोकशाही पद्धतीनेच हा प्रस्ताव मंजूर करू असं ही प्रभू यांनी सांगितलं.

तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही प्रभू यांना पाठिंबा दिला आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाचा विषय हा कायदा,अटीच्या पलीकडचा आहे. लाखो शिवसैनिकांच्या भावनेचा हा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारसोबत आम्ही चर्चा करत आहोत भावनेला महत्व देऊनच मार्ग निघेल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कारासाठी सेनेला शिवाजी पार्क एका दिवसासाठी देण्यात आलं होतं. पण कालावधी उलटून सुद्धा सेनेकडून शिवाजी पार्कवर तयार करण्यात आलेला चौथारा हटवण्यात आला नाही. याबद्दल राज्य सरकारने मुंबईचे महापौर सुनील प्रभू आणि संजय राऊत यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र मागिल तीन दिवसांपासून शिवसैनिकांनी चौथार्‍याभोवती सुरक्षाकडं उभारलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2012 10:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close