S M L

पालघर फेसबुक प्रकरणी तरूणींना अटक का केली ?:कोर्ट

30 नोव्हेंबरपालघर फेसबुक प्रकरणी शाहीन धाडा आणि रिनू श्रीनिवासन या दोन मुलींना करण्यात आलेली अटक चुकीची होती अशी माहिती ऍटर्नीज जनरलनी आज सुप्रीम कोर्टात दिली. त्यानंतर या मुलींना का अटक करण्यात आली असा जाबही कोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे. तसंच या प्रकरणातल्या दोषींवर काय कारवाई करण्यात आली आहे याचीही माहिती कोर्टाने मागितली आहे. आयटी कायद्याच्या कलम 66 (अ) ला आव्हान देणार्‍या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टाने महाराष्ट्र, दिल्ली, प. बंगाल. पाँडीचेरी आणि तामिळनाडू या राज्यांनाही नोटीस बजावली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर बंद पाळण्यात आला होता. या बंदला विरोध करत साहीनने आपल्या फेसबुकवर कमेंट अपडेट केली होती. तिच्या या कमेंटमुळे संतप्त शिवसैनिकांनी तिच्या नातेवाईकाच्या हॉस्पिटलची तोडफोड केली. पालघर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेऊन साहीन आणि रिनूला अटक केली होती. फेसबुकवर कमेंट टाकल्यामुळे अटक का करण्यात आली असा संतप्त सवाल सामाजिक संघटनांनी उपस्थित केला होता. याप्रकरणी दोन पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 30, 2012 10:16 AM IST

पालघर फेसबुक प्रकरणी तरूणींना अटक का केली ?:कोर्ट

30 नोव्हेंबर

पालघर फेसबुक प्रकरणी शाहीन धाडा आणि रिनू श्रीनिवासन या दोन मुलींना करण्यात आलेली अटक चुकीची होती अशी माहिती ऍटर्नीज जनरलनी आज सुप्रीम कोर्टात दिली. त्यानंतर या मुलींना का अटक करण्यात आली असा जाबही कोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे. तसंच या प्रकरणातल्या दोषींवर काय कारवाई करण्यात आली आहे याचीही माहिती कोर्टाने मागितली आहे. आयटी कायद्याच्या कलम 66 (अ) ला आव्हान देणार्‍या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टाने महाराष्ट्र, दिल्ली, प. बंगाल. पाँडीचेरी आणि तामिळनाडू या राज्यांनाही नोटीस बजावली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर बंद पाळण्यात आला होता. या बंदला विरोध करत साहीनने आपल्या फेसबुकवर कमेंट अपडेट केली होती. तिच्या या कमेंटमुळे संतप्त शिवसैनिकांनी तिच्या नातेवाईकाच्या हॉस्पिटलची तोडफोड केली. पालघर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेऊन साहीन आणि रिनूला अटक केली होती. फेसबुकवर कमेंट टाकल्यामुळे अटक का करण्यात आली असा संतप्त सवाल सामाजिक संघटनांनी उपस्थित केला होता. याप्रकरणी दोन पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2012 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close