S M L

सिंधुदुर्गात हत्तींचा धुडगूस, शेतकर्‍यांचं अतोनात नुकसान

विनायक वंजारे, सिंधुदुर्ग10 डिसेंबरसिंधुदुर्गात वस्तीला असलेल्या जंगली हत्तींनी पुन्हा एकदा उच्छाद मांडलाय. कुडाळ तालुक्यातल्या डिगस गावात चार हत्तींच्या कळपाने शेतकर्‍यांच्या नारळीच्या आणि केळीच्या बागा जमीनदोस्त केल्यात. तसंच साठवून ठेवलेला भात आणि गवताचाही फडशा पाडलाय. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांचा संताप अनावर झालाय.हातातोंडाशी आलेले माड आणि केळीच्या बागा आपल्या डोळ्यादेखत अशा जमीनदोस्त झालेल्या पाहून डीगसमधले हे शेतकरी हवालदील झालेत आणि संतापलेतही सिंधुदुर्गात वास्तव्यास असलेल्या चार हत्तींच्या कळपाने जिल्ह्यातल्या अनेक भागात बागायती आणि शेतीची अशी नासधूस चालवलीय.गेल्या दहा वर्षांपासून सिंधुदुर्गातले शेतकरी हत्तींच्या उपद्रवापासून त्रस्त आहेत. ऑक्टोबर 2002 मध्ये कर्नाटकातून सिंधुदुर्गात आलेल्या हत्तींना परतवून लावण्यासाठी प्रशिक्षित हत्ती आणि तज्ज्ञ वापरून वनविभागाने अनेक मोहीमा राबवल्या. कोट्यवधी रुपये खर्च केले. या प्रकारात एका हत्तीचाही बळी गेला. पण या सगळ्यानंतरही 11 हत्तींपैकी शिल्लक राहिलेल्या चार हत्तींचा धुडगूस रोखायला वनविभाग मात्र अपयशी ठरलंय. या सगळ्यामुळे पुन्हा एकदा इथल्या शेतकर्‍यांचा सरकारविरोधात तीव्र उद्रेक होईल असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिलाय.माजी वनमंत्री बबनराव पाचपुतेंनी यांनी सुरू केलेली हत्तिग्राम योजना फक्त कागदावरच राहिलीय. तर दुसरीकडे हत्तीच्या वास्तव्यामुळे शेतकर्‍यांना शासनाच्या फळबाग लागवड योजनेचाही फायदा मिळेनासा झालाय. त्यामुळे उरलेल्या या चार हत्तींनाही कर्नाटकात परत पाठवून द्या ही मागणी शेतकरी करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2012 12:58 PM IST

सिंधुदुर्गात हत्तींचा धुडगूस, शेतकर्‍यांचं अतोनात नुकसान

विनायक वंजारे, सिंधुदुर्ग

10 डिसेंबर

सिंधुदुर्गात वस्तीला असलेल्या जंगली हत्तींनी पुन्हा एकदा उच्छाद मांडलाय. कुडाळ तालुक्यातल्या डिगस गावात चार हत्तींच्या कळपाने शेतकर्‍यांच्या नारळीच्या आणि केळीच्या बागा जमीनदोस्त केल्यात. तसंच साठवून ठेवलेला भात आणि गवताचाही फडशा पाडलाय. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांचा संताप अनावर झालाय.हातातोंडाशी आलेले माड आणि केळीच्या बागा आपल्या डोळ्यादेखत अशा जमीनदोस्त झालेल्या पाहून डीगसमधले हे शेतकरी हवालदील झालेत आणि संतापलेतही सिंधुदुर्गात वास्तव्यास असलेल्या चार हत्तींच्या कळपाने जिल्ह्यातल्या अनेक भागात बागायती आणि शेतीची अशी नासधूस चालवलीय.गेल्या दहा वर्षांपासून सिंधुदुर्गातले शेतकरी हत्तींच्या उपद्रवापासून त्रस्त आहेत.

ऑक्टोबर 2002 मध्ये कर्नाटकातून सिंधुदुर्गात आलेल्या हत्तींना परतवून लावण्यासाठी प्रशिक्षित हत्ती आणि तज्ज्ञ वापरून वनविभागाने अनेक मोहीमा राबवल्या. कोट्यवधी रुपये खर्च केले. या प्रकारात एका हत्तीचाही बळी गेला. पण या सगळ्यानंतरही 11 हत्तींपैकी शिल्लक राहिलेल्या चार हत्तींचा धुडगूस रोखायला वनविभाग मात्र अपयशी ठरलंय. या सगळ्यामुळे पुन्हा एकदा इथल्या शेतकर्‍यांचा सरकारविरोधात तीव्र उद्रेक होईल असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिलाय.

माजी वनमंत्री बबनराव पाचपुतेंनी यांनी सुरू केलेली हत्तिग्राम योजना फक्त कागदावरच राहिलीय. तर दुसरीकडे हत्तीच्या वास्तव्यामुळे शेतकर्‍यांना शासनाच्या फळबाग लागवड योजनेचाही फायदा मिळेनासा झालाय. त्यामुळे उरलेल्या या चार हत्तींनाही कर्नाटकात परत पाठवून द्या ही मागणी शेतकरी करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2012 12:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close