S M L

गुवाहाटी छेडछाड प्रकरणी 11 जण दोषी

07 डिसेंबरगुवाहाटीतल्या अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी 11 जणांना दोषी ठरवण्यात आलंय. गेल्या जुलै महिन्यात छेडछाडीची ही घटना घडली होती. आणि त्याविरोधात मोठा असंतोष पसरला होता. जमावाच्या पुढे या मुलीची छेडछाड काढून तिला मारहाण करण्यात आली होती. यातल्या 4 आरोपींची कोर्टाने निर्दोष सुटका केली यात एका पत्रकाराचाही समावेश आहे. आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये 11 जुलै रोजी पीडित मुलगी आपल्या मित्रांसोबत रात्री वाढदिवसाची पार्टी करुन घरी परतत असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या मुलानी या मुलीवर अश्लील शेरेबाजी केली, त्यावरुन दोघामध्ये वाद झाला. या वादानंतर जवळच उभ्या असलेल्या 20 तरुणांनी या मुलीवर हल्ला केला. तिचा विनयभंग केला, मारहाण केली. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाही तर या मुलीचे कपडे फाडण्याचा प्रयत्नही केला. याही पेक्षा धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार भर रस्त्यावर सुरू असताना कुणीही या मुलीच्या बचावासाठी आलं नाही. दरम्यान, या घटनेची व्हिडिओग्राफी क रण्यात आली होती हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केल्यानंतर झालेला प्रकार समोर आला. पोलिसांनी फुटेजच्या साह्यानं 14 जणांना अटक केली होती

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2012 02:51 PM IST

गुवाहाटी छेडछाड प्रकरणी 11 जण दोषी

07 डिसेंबर

गुवाहाटीतल्या अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी 11 जणांना दोषी ठरवण्यात आलंय. गेल्या जुलै महिन्यात छेडछाडीची ही घटना घडली होती. आणि त्याविरोधात मोठा असंतोष पसरला होता. जमावाच्या पुढे या मुलीची छेडछाड काढून तिला मारहाण करण्यात आली होती. यातल्या 4 आरोपींची कोर्टाने निर्दोष सुटका केली यात एका पत्रकाराचाही समावेश आहे. आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये 11 जुलै रोजी पीडित मुलगी आपल्या मित्रांसोबत रात्री वाढदिवसाची पार्टी करुन घरी परतत असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या मुलानी या मुलीवर अश्लील शेरेबाजी केली, त्यावरुन दोघामध्ये वाद झाला. या वादानंतर जवळच उभ्या असलेल्या 20 तरुणांनी या मुलीवर हल्ला केला. तिचा विनयभंग केला, मारहाण केली. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाही तर या मुलीचे कपडे फाडण्याचा प्रयत्नही केला. याही पेक्षा धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार भर रस्त्यावर सुरू असताना कुणीही या मुलीच्या बचावासाठी आलं नाही. दरम्यान, या घटनेची व्हिडिओग्राफी क रण्यात आली होती हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केल्यानंतर झालेला प्रकार समोर आला. पोलिसांनी फुटेजच्या साह्यानं 14 जणांना अटक केली होती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2012 02:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close