S M L

शिवाजी पार्कची जागा सोडणार नाही -संजय राऊत

04 डिसेंबरशिवाजी पार्कवरची बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा सोडणार नाही अशी ठाम भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या अंत्यविधीची जागा रिकामी करा अशी नोटीस मुंबई महापालिकेनं महापौर सुनील प्रभू आणि खासदार संजय राऊत यांना पाठवली आहे महापौरांनी नोटीस मिळाल्याचं मान्य केलंय. पण ही नोटीस आपल्याला मिळालेली नाही असा दावा संजय राऊत यांनी केलाय. शिवाजी पार्कमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेली जागा रिकामी करण्याबाबत महापालिकेने सूचना केल्याचं नोटिशीत असल्याचं त्यांनी मान्य केलंय. मात्र बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या जागेचं पावित्र्य जपण्यासाठी तिथे चौथरा बांधण्यात आला आहे. त्या चौथर्‍याचं पावित्र्य यापुढेही जपू, असंही सुनिल प्रभू यांनी म्हटलंय. कारवाई करावी पोलीस संरक्षण देऊ - पोलीस आयुक्तशिवाजी पार्क हे महापालिकेच्या मालकीचं असल्यानं महापालिकेनंच तिथं कारवाई करावी, गरज भासली तर पोलीस त्यांना संरक्षण देतील अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी दिली. दरम्यान, मुंबई महापालिकेनं याबाबत हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलंय. स्मारकाचा वाद कोर्टात गेला तर बचावाची संधी मिळावी असं महापालिका प्रशासनाला वाटतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2012 03:46 PM IST

शिवाजी पार्कची जागा सोडणार नाही -संजय राऊत

04 डिसेंबर

शिवाजी पार्कवरची बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा सोडणार नाही अशी ठाम भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या अंत्यविधीची जागा रिकामी करा अशी नोटीस मुंबई महापालिकेनं महापौर सुनील प्रभू आणि खासदार संजय राऊत यांना पाठवली आहे महापौरांनी नोटीस मिळाल्याचं मान्य केलंय. पण ही नोटीस आपल्याला मिळालेली नाही असा दावा संजय राऊत यांनी केलाय. शिवाजी पार्कमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेली जागा रिकामी करण्याबाबत महापालिकेने सूचना केल्याचं नोटिशीत असल्याचं त्यांनी मान्य केलंय. मात्र बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या जागेचं पावित्र्य जपण्यासाठी तिथे चौथरा बांधण्यात आला आहे. त्या चौथर्‍याचं पावित्र्य यापुढेही जपू, असंही सुनिल प्रभू यांनी म्हटलंय.

कारवाई करावी पोलीस संरक्षण देऊ - पोलीस आयुक्तशिवाजी पार्क हे महापालिकेच्या मालकीचं असल्यानं महापालिकेनंच तिथं कारवाई करावी, गरज भासली तर पोलीस त्यांना संरक्षण देतील अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी दिली. दरम्यान, मुंबई महापालिकेनं याबाबत हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलंय. स्मारकाचा वाद कोर्टात गेला तर बचावाची संधी मिळावी असं महापालिका प्रशासनाला वाटतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2012 03:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close