S M L

औरंगाबादमध्ये पारधी वस्तीवर हल्ला, 7 जण जखमी

10 डिसेंबरऔरंगाबाद जिल्ह्यातील सिंधी सिरजगाव येथील पारधी समाजाच्या वस्तीवर रविवारी रात्री एका जमावानं हल्ला करून त्यांची घरं पेटवून दिली. या हल्ल्यामध्ये 7 जण जखमी झाले आहेत तर एक जण गंभीर जखमी आहे. औरंगाबाद- मुंबई हायवेवरच्या सिंधी सिरजगाव इथल्या गायरान जमिनीवर पारधी समाजाची अनेक वर्षांपासून वस्ती आहे. या वस्तीवर रात्री उशीरा काही लोकांनी हल्ला केला. आणि पारध्यांच्या झोपड्या पेटवून दिल्या. या हल्ल्यामुळे पारधी कुटंुबांचा संसार उद्धवस्त झालाय. अंधारात अचानकपणे झालेल्या या हल्ल्यामुळे कोणलाही प्रतिकार करता आला नाही. 120 एकरावरच्या गायरान जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून इथले पारधी शेती करतात. पण आता ते राहत असलेल्या जमिनीला सोन्याचा भाव आलाय. त्यामुळे ही वस्ती उठवून टाकण्यासाठी हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये 30 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2012 01:27 PM IST

औरंगाबादमध्ये पारधी वस्तीवर हल्ला, 7 जण जखमी

10 डिसेंबर

औरंगाबाद जिल्ह्यातील सिंधी सिरजगाव येथील पारधी समाजाच्या वस्तीवर रविवारी रात्री एका जमावानं हल्ला करून त्यांची घरं पेटवून दिली. या हल्ल्यामध्ये 7 जण जखमी झाले आहेत तर एक जण गंभीर जखमी आहे. औरंगाबाद- मुंबई हायवेवरच्या सिंधी सिरजगाव इथल्या गायरान जमिनीवर पारधी समाजाची अनेक वर्षांपासून वस्ती आहे. या वस्तीवर रात्री उशीरा काही लोकांनी हल्ला केला. आणि पारध्यांच्या झोपड्या पेटवून दिल्या. या हल्ल्यामुळे पारधी कुटंुबांचा संसार उद्धवस्त झालाय. अंधारात अचानकपणे झालेल्या या हल्ल्यामुळे कोणलाही प्रतिकार करता आला नाही. 120 एकरावरच्या गायरान जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून इथले पारधी शेती करतात. पण आता ते राहत असलेल्या जमिनीला सोन्याचा भाव आलाय. त्यामुळे ही वस्ती उठवून टाकण्यासाठी हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये 30 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2012 01:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close