S M L

भारतीय 'ऍथलेटिक्स' फेडरेशनची मान्यताही रद्द होणार ?

10 डिसेंबरऑलिम्पिक समितीने बॉक्सिंग, तिरंदाजीची मान्यता रद्द केल्यानंतर आज भारतीय क्रीडा क्षेत्राला आणखी एक मोठा धक्का बसला. ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता रद्द करण्याचा विचार क्रीडा मंत्रालय करतंय. केंद्रीय क्रीडा मंत्री जितेंदर सिंग याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. असं झाल्यास बॉक्सिंग आणि तिरंदाजीनंतर ऍथलेटिक्स ही तिसरी संघटना ठरणार आहे. एएफआयवर निवडणुकांमध्ये फेरफार केल्याचा ठपका क्रीडा मंत्रालयानं ठेवलाय. एएफआयवर बंदी आल्यास त्यांना क्रीडा मंत्रालयाकडून मिळणारा निधीही बंद होणार आहे. दरम्यान, AFI चे अध्यक्ष आदिल सुमारिवाला यांनी मात्र ही बातमी फेटाळून लावली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2012 02:39 PM IST

भारतीय 'ऍथलेटिक्स' फेडरेशनची मान्यताही रद्द होणार ?

10 डिसेंबर

ऑलिम्पिक समितीने बॉक्सिंग, तिरंदाजीची मान्यता रद्द केल्यानंतर आज भारतीय क्रीडा क्षेत्राला आणखी एक मोठा धक्का बसला. ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता रद्द करण्याचा विचार क्रीडा मंत्रालय करतंय. केंद्रीय क्रीडा मंत्री जितेंदर सिंग याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. असं झाल्यास बॉक्सिंग आणि तिरंदाजीनंतर ऍथलेटिक्स ही तिसरी संघटना ठरणार आहे. एएफआयवर निवडणुकांमध्ये फेरफार केल्याचा ठपका क्रीडा मंत्रालयानं ठेवलाय. एएफआयवर बंदी आल्यास त्यांना क्रीडा मंत्रालयाकडून मिळणारा निधीही बंद होणार आहे. दरम्यान, AFI चे अध्यक्ष आदिल सुमारिवाला यांनी मात्र ही बातमी फेटाळून लावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2012 02:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close