S M L

रस्त्यावरची मुलं बनली सिनेमाचे हिरो

3 डिसेंबर, गोवामनिषा महालदार सध्या गोव्यात आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल सुरू आहे. या फेस्टिव्हलमध्ये जे सिनेमे दाखवले गेले त्यात जास्त लक्षवेधी ठरलेला सिनेमा म्हणजे 'थँक्स माँ'. लहान मुलांची त्यांच्या आईवडिलांमुळे होणारी परवड यात दाखवली गेलीये. अत्यंत वास्तववादी असलेला हा सिनेमा फिल्ममेकर इरफान कमाल याने बनवला आहे. इरफान कमालचा हा पहिलाच सिनेमा असून त्याने सिनेमासाठी जवळपास 270 मुलांचं निरिक्षण केलं होतो. घाटकोपरमधून अशा 5 मुलांची निवड केली जे स्वत: वाईट अवस्थेत जगतायत. त्याने त्या मुलांची पूर्णपणे जबाबदारीही स्वीकारली होती. मुंबईतल्या रस्त्यावर जगणार्‍या मुलांच्या या सिनेमात याच मुलांना प्रमुख भूमिका दिली. खूप चॅलेंजेस होते. कारण मला या सिनेमात एक जिवंतपणा दाखवयाचा होता आणि त्यासाठी मला तशाच स्टारकास्टची गरज होती. म्हणून आम्ही तशाच लहान मुलांना घ्यायचं ठरवलं. आमच्यासाठी हा एक खूप मोठा टास्क होता. एकतर ही मुलं नीट लिहू-वाचू शकत नव्हती. त्यामुळे त्यांना एकत्र आणणं, त्यांच्याबरोबर काम करणं, हे प्रकारे मोठं आव्हान होतं, अशी माहिती सिनेमाचा दिग्दर्शक इरफान कमाल यानं दिली. सिनेमातल्या मुलांची नावंही मजेशीर आहेत. म्युन्सिपाल्टी घाटकोपर हे एका मुलाचं नाव आणि त्याच्या इतर मित्रांची नावंही तितकीच इंटरेस्टिंग आहेत आणि ती म्हणजे सोडा, सुरसुरी, कटींग आणि देढशाणा. ही नावं अशी मुंबई टाइपच आहेत. मुन्सिपाल्टी घाटकोपर हा एक 12 वर्षांचा मुलगा आहे आणि तो म्युन्सिपाल्टी इथे सापडला,म्हणून त्याला मुन्सिपल घाटकोपर म्हणतात. राग येणार्‍या व्यक्तीसाठी सोडा हे टिपिकल नाव आहे. म्हणून ते त्याला म्हणत 'क्या रे सोडा तेरा क्या फट रहा हैं'. यांच्यात अजून एक मुलगा आहे, त्याला कटींग म्हटलं जातं. कारण तो एका टी-स्टॉलवर काम करत असे. आणि अजून एक होता देढशाणा जो नॉरमल लोकांपेक्षा जरा जास्त स्मार्ट आहे...एक होता सुरसूरी ज्याच नाक नेहमीच गळत असायचं.रणवीर शौरी, बॅरी जॉन, रघुवीर यादव या कलाकारांना घेऊन हा सिनेमा नव्याने बनवण्यात येणारेय. पुढच्यावर्षी फेब्रुवारी माहिन्यात हा सिनेमा नव्याने रिलीज होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2008 02:33 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2008 02:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close