S M L

मोदींनी गुन्हेगारांनाच पाठीशी घातलं -सोनिया गांधी

10 डिसेंबरगुजरात विधानसभेचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. रविवारी पंतप्रधानांनी केलेल्या टीकेनंतर आज सोनिया गांधी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. पण विशेष म्हणजे या टीकेत गुजरातमधल्या 2002 साली झालेल्या दंगलींचा थेट उल्लेख त्यांनी केला नाही. गुजरातमध्ये कायदा आणि सुव्यस्था नावाची गोष्टच नसल्याची टीका गांधी यांनी केली. भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये.रविवारी पंतप्रधानांनी गुजरातमध्ये अल्पसंख्यांक लोक सुरक्षित नसल्याचा आरोप केला होता. तर त्याला प्रत्युत्तर देताना मोदी यांनी पंतप्रधान व्होट बँकेचं राजकारण खेळत असल्याचा आरोप केलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2012 05:53 PM IST

मोदींनी गुन्हेगारांनाच पाठीशी घातलं -सोनिया गांधी

10 डिसेंबर

गुजरात विधानसभेचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. रविवारी पंतप्रधानांनी केलेल्या टीकेनंतर आज सोनिया गांधी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. पण विशेष म्हणजे या टीकेत गुजरातमधल्या 2002 साली झालेल्या दंगलींचा थेट उल्लेख त्यांनी केला नाही. गुजरातमध्ये कायदा आणि सुव्यस्था नावाची गोष्टच नसल्याची टीका गांधी यांनी केली. भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये.रविवारी पंतप्रधानांनी गुजरातमध्ये अल्पसंख्यांक लोक सुरक्षित नसल्याचा आरोप केला होता. तर त्याला प्रत्युत्तर देताना मोदी यांनी पंतप्रधान व्होट बँकेचं राजकारण खेळत असल्याचा आरोप केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2012 05:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close