S M L

'अलिबाग से...' या डायलॉगमुळे अलीबागकर संतापले

08 डिसेंबरसिनेमे कोणत्या वादात अडकू शकतात याचा काही नेम नाही. काही सिनेमे वादात अडकण्यासाठी जन्म घेतात तर काही विनाकारण वाद ओढावून घेतात. पण आता मि.परफेक्टशिनिस्ट आमीर खानचा तलाश हा चित्रपट आता एका मजेशीर वादात सापडला आहे. ''ये अलिबाग का समझा है क्या' या डायलॉगवरून अलिबागकरांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. त्यामुळे अलिबागची बदनामी करण्यात आली आहे असा आरोप अलीबागच्या नगराध्यक्षा नमिता नाईक यांनी केला आहे.अलिबागला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे अनेक चित्रपटातून अलिबागचा उल्लेख केला जातो हे थांबवलं गेलं पाहिजे यासाठी आम्ही दिग्दर्शक, निर्माते यांना याबद्दल जाब विचार आहोत तसेच यासाठी कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचंही नाईक यांनी सांगितलंय. अशा सिनेमाबद्दल सेन्सॉर बोर्ड गप्प का राहतं असा सवालही नाईक यांनी उपस्थित केला. अलीबागचा उल्लेख या अगोदरही अनेक चित्रपटांमध्ये गंमतीचा आशयाने केला गेला आहे. राम गोपाल वर्मा यांच्या अंडरवर्ल्डवर आधारीत सत्या चित्रपटातही असाच उल्लेख केला गेला होता. तेव्हाही अलीबागकरांनी याचा निषेध केला होता. आता मात्र आपल्या लाडक्या शहराच्या प्रतिष्ठेसाठी न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा अलिबागकरांनी दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 8, 2012 11:33 AM IST

'अलिबाग से...' या डायलॉगमुळे अलीबागकर संतापले

08 डिसेंबर

सिनेमे कोणत्या वादात अडकू शकतात याचा काही नेम नाही. काही सिनेमे वादात अडकण्यासाठी जन्म घेतात तर काही विनाकारण वाद ओढावून घेतात. पण आता मि.परफेक्टशिनिस्ट आमीर खानचा तलाश हा चित्रपट आता एका मजेशीर वादात सापडला आहे. ''ये अलिबाग का समझा है क्या' या डायलॉगवरून अलिबागकरांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. त्यामुळे अलिबागची बदनामी करण्यात आली आहे असा आरोप अलीबागच्या नगराध्यक्षा नमिता नाईक यांनी केला आहे.

अलिबागला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे अनेक चित्रपटातून अलिबागचा उल्लेख केला जातो हे थांबवलं गेलं पाहिजे यासाठी आम्ही दिग्दर्शक, निर्माते यांना याबद्दल जाब विचार आहोत तसेच यासाठी कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचंही नाईक यांनी सांगितलंय. अशा सिनेमाबद्दल सेन्सॉर बोर्ड गप्प का राहतं असा सवालही नाईक यांनी उपस्थित केला. अलीबागचा उल्लेख या अगोदरही अनेक चित्रपटांमध्ये गंमतीचा आशयाने केला गेला आहे. राम गोपाल वर्मा यांच्या अंडरवर्ल्डवर आधारीत सत्या चित्रपटातही असाच उल्लेख केला गेला होता. तेव्हाही अलीबागकरांनी याचा निषेध केला होता. आता मात्र आपल्या लाडक्या शहराच्या प्रतिष्ठेसाठी न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा अलिबागकरांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2012 11:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close