S M L

राज्यसभेत एफडीआयचा मार्ग सुकर

6 डिसेंबरलोकसभेत एफडीआयचा लढा जिंकल्यानंतर राज्यसभेतही सरकारचाच विजय होईल, हे आता स्पष्ट झालाय. राज्यसभेत गुरुवारी एफडीआयवर चर्चा सुरू झाली. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावतींनी एफडीआयला विरोध केला. पण त्यांनी सरकारला मोठा दिलासाही दिलाय. मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेली अनेक विधेयकं मार्गी लावण्यासाठी एफडीआयच्या मुद्द्यावर शुक्रवारी सरकारच्या बाजूनं मतदान करणार असल्याची घोषणा मायावतींनी केली. तर राज्यसभेत शुक्रवारी मतदानावेळी समाजवादी पक्ष सभात्याग करणार असल्याचं समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी सांगितलंय. त्यामुळे सभागृहाचं संख्याबळ कमी होऊन, सरकारच्याच विजयाचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान, मायावतींनी भाजपवर जोरदार तोफ डागली. लोकसभेत काल सुषमा स्वराज यांनी सीबीआयबाबत केलेल्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 6, 2012 05:05 PM IST

राज्यसभेत एफडीआयचा मार्ग सुकर

6 डिसेंबर

लोकसभेत एफडीआयचा लढा जिंकल्यानंतर राज्यसभेतही सरकारचाच विजय होईल, हे आता स्पष्ट झालाय. राज्यसभेत गुरुवारी एफडीआयवर चर्चा सुरू झाली. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावतींनी एफडीआयला विरोध केला. पण त्यांनी सरकारला मोठा दिलासाही दिलाय. मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेली अनेक विधेयकं मार्गी लावण्यासाठी एफडीआयच्या मुद्द्यावर शुक्रवारी सरकारच्या बाजूनं मतदान करणार असल्याची घोषणा मायावतींनी केली. तर राज्यसभेत शुक्रवारी मतदानावेळी समाजवादी पक्ष सभात्याग करणार असल्याचं समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी सांगितलंय. त्यामुळे सभागृहाचं संख्याबळ कमी होऊन, सरकारच्याच विजयाचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान, मायावतींनी भाजपवर जोरदार तोफ डागली. लोकसभेत काल सुषमा स्वराज यांनी सीबीआयबाबत केलेल्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2012 05:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close