S M L

हिवाळी अधिवेशनात दुसर्‍या दिवशीही गदारोळ

11 डिसेंबरहिवाळी अधिवेशनाच्या सलग दुसर्‍या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळच झाला. सिंचन घोटाळा,अजित पवार यांचा शपथविधी आणि शिवसेनेचा अविश्‍वास प्रस्ताव या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. अजित पवार यांचं उपमुख्यमंत्रीपद घटनाबाह्य असल्याचा आरोप विरोधकांनी पुन्हा एकदा विधिमंडळात केला. पण हे पद घटनेनुसारच आहे असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे, आर.आर. पाटील यांनी सरकारविरूद्धच्या अविश्‍वास प्रस्तावाविरुद्ध रस्त्यावर उतरून उत्तर दिलं जाईल असं वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे विरोधक संतापले. यानंतर विधानसभेत गोंधळ अधिकच वाढला. विधान परिषदेप्रमाणेच विधानसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.अविश्‍वास प्रस्तावाच्या मुद्द्यावर शिवसेना एकाकी पडलीय. पण तरीही या प्रस्तावावर शिवसेना ठाम आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2012 09:23 AM IST

हिवाळी अधिवेशनात दुसर्‍या दिवशीही गदारोळ

11 डिसेंबर

हिवाळी अधिवेशनाच्या सलग दुसर्‍या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळच झाला. सिंचन घोटाळा,अजित पवार यांचा शपथविधी आणि शिवसेनेचा अविश्‍वास प्रस्ताव या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. अजित पवार यांचं उपमुख्यमंत्रीपद घटनाबाह्य असल्याचा आरोप विरोधकांनी पुन्हा एकदा विधिमंडळात केला. पण हे पद घटनेनुसारच आहे असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे, आर.आर. पाटील यांनी सरकारविरूद्धच्या अविश्‍वास प्रस्तावाविरुद्ध रस्त्यावर उतरून उत्तर दिलं जाईल असं वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे विरोधक संतापले. यानंतर विधानसभेत गोंधळ अधिकच वाढला. विधान परिषदेप्रमाणेच विधानसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.अविश्‍वास प्रस्तावाच्या मुद्द्यावर शिवसेना एकाकी पडलीय. पण तरीही या प्रस्तावावर शिवसेना ठाम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2012 09:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close