S M L

दीड तासांचा 'आयना का बायना' (समीक्षा)

अमोल परचुरे, चित्रपट समीक्षक30 नोव्हेंबर'आयना का बायना' सिनेमाचे प्रोमो बघून वाटतं की हा एक डान्सिकल सिनेमा आहे.. सिनेमा बघितल्यावर जाणवतं सिनेमात डान्स केंद्रस्थानी असला तरी हा सिनेमा फक्त डान्सिकल किंवा डान्सबद्दल नाहीये. हा सिनेमा आहे बालसुधार गृहातल्या मुलांच्या जिद्दीचा, त्यांच्या मेहनतीचा, त्यांच्या स्वप्नांचा आणि डान्स रिऍलिटी शोपर्यंतच्या त्यांच्या विजयी प्रवासाचा...बालसुधारगृह म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतात ती वाया गेलेली, गुन्हेगार मार्गाला लागलेली मुलं..त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोनच नकारात्मक असतो. नाव सुधारगृह असलं तरी अशा मुलांना सुधारण्याची संधी बर्‍याचदा नाकारण्यात येते. अशाच एका सुधारगृहातल्या मुलांवर, त्यांच्या आयुष्यावर आधारीत आहे आयना का बायना हा सिनेमा...या मुलांना अतिशय कडक शिस्तीत वाढवलं, थोडी जरी चूक झाली तरी भयंकर शिक्षा केली तर आणि तरच ही मुलं सुधारू शकतात असा ठाम विश्वास असलेले या सुधारगृहाचे वॉर्डन हर्षवर्धन साठे (सचिन खेडेकर) आणि या मुलांना थोड्या शिस्तीबरोबरच मानसिक आधारही महत्त्वाचा आहे, त्यांचं मन जाणून घेणंही गरजेचं आहे असं मानणारी काऊंसिलर शिवानी (अमृता खानविलकर) या दोघांमधलाही संघर्ष यामध्ये आहे. या मुलांचं मन मोकळं करण्यासाठी शिवानी ही डान्स थेरपीचाही वापर करत असते. याच थेरपीमुळे या मुलांमध्ये डान्सची आवड तयार होते. त्यातली काही मुलं तर वेगवेगळ्या डान्स प्रकारांमध्ये तरबेज होतात आणि मग एका स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपली कला सादर करण्याची, स्वत:ला सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळते. पण या स्पर्धेत भाग घेणं त्यांच्यासाठी सोपं नसतं अनेक अडचणी त्यांच्या मार्गात असतात. या अडचणींवर मात करत ही मुलं या स्पर्धेपर्यंत कसे पोहचतात या प्रवासाची गोष्ट आहे आयना का बायना...महत्त्वाचं म्हणजे आयना का बायना हा सिनेमा आहे जवळपास दीड तासांचा..डान्सचा वापर करत समाजातली एक गंभीर समस्या, त्याकडे बघण्याची समाजाची वेगवेगळी दृष्टी, मुलांचे सुपरडुपर तगडे डान्स परफॉर्मन्सेस, बालसुधारगृहातलं वातावरण, इथं आलेल्या मुलांचं गत आयुष्य, आणि वॉर्डन हर्षवर्धन साठे विरुध्द शिवानी हा सामना एवढं सगळं दिग्दर्शक समित कक्कडनं दीड तासात बसवलंय हेच कौतुकास्पद आहे. आणखी कौतुक करायला हवं ते यात काम करणार्‍या मुलांचं...जबरदस्त उत्साहानं, जबरदस्त एनर्जीनं, या मुलांनी सुधारगृहातल्या मुलांची भूमिका सादर केलीये. खरंतर ही भूमिका साकारणारी मुलं उत्तम डान्सर्स आहेत, पण डान्सबरोबरच त्यांनी चांगला अभिनयही केलाय हे महत्त्वाचं..जॅझ, ही-पॉप या प्रकारातले डान्स प्रकार जे सध्या रिऍलिटी शोमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. त्या डान्सनी आलेलं झपाटलेपण या मुलांनी चांगलं दाखवलंय. अमृता खानविलकर, गणेश यादव, पहिल्यांदाच मराठीत काम करत असलेला राकेश वशिष्ठ, किशोर चौगुले, जयवंत वाडकर यांनीही आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका उत्तम साकारल्यात..डान्स, मुलांची एनर्जी, सिनेमाचा विषय याबरोबरच सिनेमाचं आणखी एक आकर्षण म्हणजे अर्थात सचिन खेडेकर.. काकस्पर्शनंतर पूर्णपणे वेगळ्या प्रकारचा रोल सचिननं तगडाच साकारलाय पण सिनेमात सचिन खेडेकरचा डान्स परफॉर्मन्स ही पुन्हापुन्हा आठवणारी गोष्ट आहे. हा परफॉर्मन्स तर पाहायलाच पाहिजे असा आहे.का पाहवा आणि का पाहू नये ?सिनेमाची लांबी कमी असल्यामुळे दिग्दर्शकानं फार लांबण न लावता पटापट सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. एकप्रकारे हे चांगलं असलं तरी ज्या प्रेक्षकांना अशा फास्ट टेकिंगची सवय नाही त्यांना ते खटकू शकतं पण तरी युवावर्ग नक्कीच हा सिनेमा एन्जॉय करेल असं वाटतं. सिनेमाची कथा सादर करताना समितनं एक प्रयोग केलाय. सलगपणे या सिनेमाची स्टोरी आपल्यासमोर येत नाही, मध्येच फ्लॅशबॅक, पुन्हा सध्याचा काळ, पुन्हा थोडा फ्लॅशबॅक असं तंत्र वापरण्यात आलंय. प्रयोग म्हणून चांगला असला तरी त्यामध्ये अजून थोडी सहजता यायला हवी होती. काही ठिकाणी संगती तुटण्याचा भास होतो, सिनेमातल्या गाण्यांचा ठेका डान्स परफॉर्मन्ससाठी करेक्ट आहे, पण बर्‍याच ठिकाणी त्यातले शब्दच कळत नाहीत अर्थात डान्स बघण्यात या अशा उणिवा थोड्या मागे राहतात. एकंदरित एक उत्तम टेकिंग असलेला, फाईन सिनेमा असं या 'आयना का बायना' बद्दल सांगता येईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 30, 2012 03:34 PM IST

दीड तासांचा 'आयना का बायना' (समीक्षा)

अमोल परचुरे, चित्रपट समीक्षक

30 नोव्हेंबर

'आयना का बायना' सिनेमाचे प्रोमो बघून वाटतं की हा एक डान्सिकल सिनेमा आहे.. सिनेमा बघितल्यावर जाणवतं सिनेमात डान्स केंद्रस्थानी असला तरी हा सिनेमा फक्त डान्सिकल किंवा डान्सबद्दल नाहीये. हा सिनेमा आहे बालसुधार गृहातल्या मुलांच्या जिद्दीचा, त्यांच्या मेहनतीचा, त्यांच्या स्वप्नांचा आणि डान्स रिऍलिटी शोपर्यंतच्या त्यांच्या विजयी प्रवासाचा...

बालसुधारगृह म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतात ती वाया गेलेली, गुन्हेगार मार्गाला लागलेली मुलं..त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोनच नकारात्मक असतो. नाव सुधारगृह असलं तरी अशा मुलांना सुधारण्याची संधी बर्‍याचदा नाकारण्यात येते. अशाच एका सुधारगृहातल्या मुलांवर, त्यांच्या आयुष्यावर आधारीत आहे आयना का बायना हा सिनेमा...या मुलांना अतिशय कडक शिस्तीत वाढवलं, थोडी जरी चूक झाली तरी भयंकर शिक्षा केली तर आणि तरच ही मुलं सुधारू शकतात असा ठाम विश्वास असलेले या सुधारगृहाचे वॉर्डन हर्षवर्धन साठे (सचिन खेडेकर) आणि या मुलांना थोड्या शिस्तीबरोबरच मानसिक आधारही महत्त्वाचा आहे, त्यांचं मन जाणून घेणंही गरजेचं आहे असं मानणारी काऊंसिलर शिवानी (अमृता खानविलकर) या दोघांमधलाही संघर्ष यामध्ये आहे.

या मुलांचं मन मोकळं करण्यासाठी शिवानी ही डान्स थेरपीचाही वापर करत असते. याच थेरपीमुळे या मुलांमध्ये डान्सची आवड तयार होते. त्यातली काही मुलं तर वेगवेगळ्या डान्स प्रकारांमध्ये तरबेज होतात आणि मग एका स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपली कला सादर करण्याची, स्वत:ला सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळते. पण या स्पर्धेत भाग घेणं त्यांच्यासाठी सोपं नसतं अनेक अडचणी त्यांच्या मार्गात असतात. या अडचणींवर मात करत ही मुलं या स्पर्धेपर्यंत कसे पोहचतात या प्रवासाची गोष्ट आहे आयना का बायना...

महत्त्वाचं म्हणजे आयना का बायना हा सिनेमा आहे जवळपास दीड तासांचा..डान्सचा वापर करत समाजातली एक गंभीर समस्या, त्याकडे बघण्याची समाजाची वेगवेगळी दृष्टी, मुलांचे सुपरडुपर तगडे डान्स परफॉर्मन्सेस, बालसुधारगृहातलं वातावरण, इथं आलेल्या मुलांचं गत आयुष्य, आणि वॉर्डन हर्षवर्धन साठे विरुध्द शिवानी हा सामना एवढं सगळं दिग्दर्शक समित कक्कडनं दीड तासात बसवलंय हेच कौतुकास्पद आहे. आणखी कौतुक करायला हवं ते यात काम करणार्‍या मुलांचं...जबरदस्त उत्साहानं, जबरदस्त एनर्जीनं, या मुलांनी सुधारगृहातल्या मुलांची भूमिका सादर केलीये.

खरंतर ही भूमिका साकारणारी मुलं उत्तम डान्सर्स आहेत, पण डान्सबरोबरच त्यांनी चांगला अभिनयही केलाय हे महत्त्वाचं..जॅझ, ही-पॉप या प्रकारातले डान्स प्रकार जे सध्या रिऍलिटी शोमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. त्या डान्सनी आलेलं झपाटलेपण या मुलांनी चांगलं दाखवलंय. अमृता खानविलकर, गणेश यादव, पहिल्यांदाच मराठीत काम करत असलेला राकेश वशिष्ठ, किशोर चौगुले, जयवंत वाडकर यांनीही आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका उत्तम साकारल्यात..डान्स, मुलांची एनर्जी, सिनेमाचा विषय याबरोबरच सिनेमाचं आणखी एक आकर्षण म्हणजे अर्थात सचिन खेडेकर.. काकस्पर्शनंतर पूर्णपणे वेगळ्या प्रकारचा रोल सचिननं तगडाच साकारलाय पण सिनेमात सचिन खेडेकरचा डान्स परफॉर्मन्स ही पुन्हापुन्हा आठवणारी गोष्ट आहे. हा परफॉर्मन्स तर पाहायलाच पाहिजे असा आहे.

का पाहवा आणि का पाहू नये ?

सिनेमाची लांबी कमी असल्यामुळे दिग्दर्शकानं फार लांबण न लावता पटापट सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. एकप्रकारे हे चांगलं असलं तरी ज्या प्रेक्षकांना अशा फास्ट टेकिंगची सवय नाही त्यांना ते खटकू शकतं पण तरी युवावर्ग नक्कीच हा सिनेमा एन्जॉय करेल असं वाटतं. सिनेमाची कथा सादर करताना समितनं एक प्रयोग केलाय. सलगपणे या सिनेमाची स्टोरी आपल्यासमोर येत नाही, मध्येच फ्लॅशबॅक, पुन्हा सध्याचा काळ, पुन्हा थोडा फ्लॅशबॅक असं तंत्र वापरण्यात आलंय. प्रयोग म्हणून चांगला असला तरी त्यामध्ये अजून थोडी सहजता यायला हवी होती. काही ठिकाणी संगती तुटण्याचा भास होतो, सिनेमातल्या गाण्यांचा ठेका डान्स परफॉर्मन्ससाठी करेक्ट आहे, पण बर्‍याच ठिकाणी त्यातले शब्दच कळत नाहीत अर्थात डान्स बघण्यात या अशा उणिवा थोड्या मागे राहतात. एकंदरित एक उत्तम टेकिंग असलेला, फाईन सिनेमा असं या 'आयना का बायना' बद्दल सांगता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2012 03:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close