S M L

हिवाळी अधिवेशनात गोंधळात-गोंधळ

12 डिसेंबरहिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवसही गोंधळात-गोंधळ झाला. शिवसेनेच्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी विरोधाकांना धमकी दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला. त्यावर आर आर पाटील यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. पण आर आर पाटील यांनी माफी मागायला स्पष्ट नकार दिल्याने विधानसभेत वाद कायम राहिला त्यातच शिवसेनेचा अविश्वास प्रस्ताव रद्द करण्याची घोषणा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केल्यानं विरोधकांनी विधानसभेत प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तर तिकडे विधानपरीषदेत सिंचन घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी लावून धरल्यानं विधान परिषदही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 12, 2012 10:20 AM IST

हिवाळी अधिवेशनात गोंधळात-गोंधळ

12 डिसेंबर

हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवसही गोंधळात-गोंधळ झाला. शिवसेनेच्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी विरोधाकांना धमकी दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला. त्यावर आर आर पाटील यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. पण आर आर पाटील यांनी माफी मागायला स्पष्ट नकार दिल्याने विधानसभेत वाद कायम राहिला त्यातच शिवसेनेचा अविश्वास प्रस्ताव रद्द करण्याची घोषणा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केल्यानं विरोधकांनी विधानसभेत प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तर तिकडे विधानपरीषदेत सिंचन घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी लावून धरल्यानं विधान परिषदही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2012 10:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close