S M L

'धोणीला कॅप्टनपदावरून काढण्याची केली होती शिफारस'

12 डिसेंबरभारताचे माजी क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ यांनी भारतीय कॅप्टन महेंद्रसिंग धोणीला लक्ष केलंय. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौर्‍यातल्या मानहानिकारक पराभवानंतर भारतीय टीमला मायेदशातही इंग्लंडविरूद्ध सलग दोन पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या पराभवानंतरही धोणी कॅप्टनपदी का राहिला, असा सवाल मोहिंदर अमरनाथ यांनी उपस्थित केलाय. निवड समितीचे माजी अध्यक्ष के श्रीकांत यांच्यासह निवड समितीतली इतर माजी पाच सदस्यांना धोणी कॅप्टनपदी नको होता पण बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासनं यांनी धोणीला वाचल्याचा गौप्यस्फोटही अमरनाथ यांनी केला. धोणीकडे टेस्ट कॅप्टनपदाची क्षमता नाही, त्याच्याऐवजी गौतम गंभीरला कॅप्टनपदाची जबाबदारी देण्यात यावी असं अमरनाथ यांनी म्हटलंय. नागपूर टेस्ट ही धोणीसाठी अखेरची संधी असल्याचंही अमरनाथ यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 12, 2012 10:38 AM IST

'धोणीला कॅप्टनपदावरून काढण्याची केली होती शिफारस'

12 डिसेंबर

भारताचे माजी क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ यांनी भारतीय कॅप्टन महेंद्रसिंग धोणीला लक्ष केलंय. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौर्‍यातल्या मानहानिकारक पराभवानंतर भारतीय टीमला मायेदशातही इंग्लंडविरूद्ध सलग दोन पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या पराभवानंतरही धोणी कॅप्टनपदी का राहिला, असा सवाल मोहिंदर अमरनाथ यांनी उपस्थित केलाय. निवड समितीचे माजी अध्यक्ष के श्रीकांत यांच्यासह निवड समितीतली इतर माजी पाच सदस्यांना धोणी कॅप्टनपदी नको होता पण बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासनं यांनी धोणीला वाचल्याचा गौप्यस्फोटही अमरनाथ यांनी केला. धोणीकडे टेस्ट कॅप्टनपदाची क्षमता नाही, त्याच्याऐवजी गौतम गंभीरला कॅप्टनपदाची जबाबदारी देण्यात यावी असं अमरनाथ यांनी म्हटलंय. नागपूर टेस्ट ही धोणीसाठी अखेरची संधी असल्याचंही अमरनाथ यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2012 10:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close