S M L

रोहयोत घोटाळा, मजुरांच्या मोबदल्यावर भ्रष्टाचार्‍यांचा डल्ला

13 डिसेंबरअहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी गावात रोजगार हमी योजनेत घोटाळा झालाय. दुष्काळी भागात राज्य सरकारने रोजगार हमी योजना सुरू केली होती. शंकरवाडी गावात या योजनेनुसार गावातील 180 मजुरांनी 90 दिवस काम केलं. त्या कामाचे प्रतिदिन 150 रूपये प्रमाणे प्रत्येक मजुराला 13,500 मिळणे अपेक्षित होते. मात्र मजुरांच्या हाती प्रत्येकी अवघे 900 रूपयेच देण्यात आले आणि दमदाटी करून कामगारांकडून कोर्‍या कागदावर अंगठाही घेण्यात आला. तसंच कामगारांचे पोस्टात जमा झालेले पैसेही परस्पर काढून घेण्यात आले. गावकर्‍यांनी यासंदर्भात वारंवार तक्रारी दाखल करूनही सरकारी पातळीवर कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. गावकर्‍यांनी याप्रकरणी आता आमरण उपोषणाचा इशारा दिलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2012 04:37 PM IST

रोहयोत घोटाळा, मजुरांच्या मोबदल्यावर भ्रष्टाचार्‍यांचा डल्ला

13 डिसेंबर

अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी गावात रोजगार हमी योजनेत घोटाळा झालाय. दुष्काळी भागात राज्य सरकारने रोजगार हमी योजना सुरू केली होती. शंकरवाडी गावात या योजनेनुसार गावातील 180 मजुरांनी 90 दिवस काम केलं. त्या कामाचे प्रतिदिन 150 रूपये प्रमाणे प्रत्येक मजुराला 13,500 मिळणे अपेक्षित होते. मात्र मजुरांच्या हाती प्रत्येकी अवघे 900 रूपयेच देण्यात आले आणि दमदाटी करून कामगारांकडून कोर्‍या कागदावर अंगठाही घेण्यात आला. तसंच कामगारांचे पोस्टात जमा झालेले पैसेही परस्पर काढून घेण्यात आले. गावकर्‍यांनी यासंदर्भात वारंवार तक्रारी दाखल करूनही सरकारी पातळीवर कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. गावकर्‍यांनी याप्रकरणी आता आमरण उपोषणाचा इशारा दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2012 04:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close