S M L

अजित पवारांना मंत्रिमंडळात स्थान म्हणजे अटकपूर्व जामीन -तावडे

08 डिसेंबरअजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यामुळे अधिवेशनात अजित पवारांना टार्गेट करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून होणार आहेत. अजित पवार यांना श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून मंत्रिमंडळात स्थान मिळणं म्हणजे अजितदादांनी अटकपूर्व जामीन मिळविल्या सारखं आहे अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली. एसआयटीची मागणी आणि पीआयएल नंतर हा जामीन टिकणार नाही असंही तावडे म्हणाले. हे अधिवेशन वादळी व्हावं याची व्यवस्था मुख्यमंत्र्यांनीच केलीय. मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांनाच विरोधकांसमोर आणल्यामुळे सभागृहातच खरी लढाई बघायला मिळणार असल्याचं तावडे यांनी म्हटलंय. ते नागपूरात बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 8, 2012 03:59 PM IST

अजित पवारांना मंत्रिमंडळात स्थान म्हणजे अटकपूर्व जामीन -तावडे

08 डिसेंबर

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यामुळे अधिवेशनात अजित पवारांना टार्गेट करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून होणार आहेत. अजित पवार यांना श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून मंत्रिमंडळात स्थान मिळणं म्हणजे अजितदादांनी अटकपूर्व जामीन मिळविल्या सारखं आहे अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली. एसआयटीची मागणी आणि पीआयएल नंतर हा जामीन टिकणार नाही असंही तावडे म्हणाले. हे अधिवेशन वादळी व्हावं याची व्यवस्था मुख्यमंत्र्यांनीच केलीय. मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांनाच विरोधकांसमोर आणल्यामुळे सभागृहातच खरी लढाई बघायला मिळणार असल्याचं तावडे यांनी म्हटलंय. ते नागपूरात बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2012 03:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close