S M L

जळगावात पाझर तलावासाठी गावकर्‍यांचं आमरण उपोषण

11 डिसेंबरजळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यात 11 गावांसाठी महत्त्वाच्या असलेल्या लोणी गावातील लघुसिंचनाच्या पाझर तलावाचं काम 29 वर्षांपासून रखडलंय. हे काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी गावातल्या शेतकर्‍यांनी आपल्या कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केलंय. या पाझर तलावाला 1983 मध्ये मान्यता मिळाली होती. आणि त्याचं 90 टक्के काम पूर्णही झालं होतंं. पण गेल्या 25 वर्षांपासून मात्र उरलेलं काम अपूर्णावस्थेत आहे. वेळोवेळी आश्‍वासनं देऊनंही या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या 11 गावांना अजूनही पाणीटंचाईला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे गावकर्‍यांनी अखेर आमरण उपोषणाचं हत्यार उपसले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2012 10:57 AM IST

जळगावात पाझर तलावासाठी गावकर्‍यांचं आमरण उपोषण

11 डिसेंबर

जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यात 11 गावांसाठी महत्त्वाच्या असलेल्या लोणी गावातील लघुसिंचनाच्या पाझर तलावाचं काम 29 वर्षांपासून रखडलंय. हे काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी गावातल्या शेतकर्‍यांनी आपल्या कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केलंय. या पाझर तलावाला 1983 मध्ये मान्यता मिळाली होती. आणि त्याचं 90 टक्के काम पूर्णही झालं होतंं. पण गेल्या 25 वर्षांपासून मात्र उरलेलं काम अपूर्णावस्थेत आहे. वेळोवेळी आश्‍वासनं देऊनंही या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या 11 गावांना अजूनही पाणीटंचाईला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे गावकर्‍यांनी अखेर आमरण उपोषणाचं हत्यार उपसले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2012 10:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close