S M L

'शिवतीर्था'बाबत शिवसेनेची भूमिका मवाळ

12 डिसेंबरशिवाजी पार्कचं नामांतर 'शिवतीर्थ' करण्यात यावं या मुद्द्यावरून आता शिवसेनेने काहीशी माघार घेतलीय. शिवाजी पार्कला शिवतीर्थ हे नाव देण्याचा आपला प्रस्ताव कधीच नव्हता. तर फक्त मैदानात ज्या ठिकाणी बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार झाले, त्या ठिकाणच्या चौथर्‍याला फक्त शिवतीर्थ हे नाव देण्याचा प्रस्ताव आता शिवसेना 19 तारखेच्या गटनेत्यांच्या बैठकीत मांडणार आहे. आणि 20 तारखेच्या महासभेतही हा प्रस्ताव चर्चेला येईल अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिलीय. पण सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीत जी कडक भूमिका घेतली. त्यानंतर शिवसेनेनं आता आपल्या रणनीतीत थोडा बदल केलाय. त्याचबरोबर भाजपनेही शिवाजी पार्कला शिवतीर्थ नाव देण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेनं आता सावध भूमिका घेतलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 12, 2012 02:58 PM IST

'शिवतीर्था'बाबत शिवसेनेची भूमिका मवाळ

12 डिसेंबर

शिवाजी पार्कचं नामांतर 'शिवतीर्थ' करण्यात यावं या मुद्द्यावरून आता शिवसेनेने काहीशी माघार घेतलीय. शिवाजी पार्कला शिवतीर्थ हे नाव देण्याचा आपला प्रस्ताव कधीच नव्हता. तर फक्त मैदानात ज्या ठिकाणी बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार झाले, त्या ठिकाणच्या चौथर्‍याला फक्त शिवतीर्थ हे नाव देण्याचा प्रस्ताव आता शिवसेना 19 तारखेच्या गटनेत्यांच्या बैठकीत मांडणार आहे. आणि 20 तारखेच्या महासभेतही हा प्रस्ताव चर्चेला येईल अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिलीय. पण सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीत जी कडक भूमिका घेतली. त्यानंतर शिवसेनेनं आता आपल्या रणनीतीत थोडा बदल केलाय. त्याचबरोबर भाजपनेही शिवाजी पार्कला शिवतीर्थ नाव देण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेनं आता सावध भूमिका घेतलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2012 02:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close