S M L

टेरर इन्श्युरन्स महत्त्व वाढतंय

3 नोव्हेंबर, हैदराबादशेख अहमद अलीदहशतवादी हल्ल्यानंतर सर्वात जास्त महत्त्व आलंय ते टेरर इन्श्युरन्सला. म्हणजेच अतिरेकी हल्ल्यांसाठी काढला गेलेला विमा. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर टेरर इन्श्युरन्स पुरवणार्‍या कंपन्याचा खप पाचपटीनं वाढलाय. गेल्यावर्षी हैदराबादच्या ' गोकुळ चाट ' मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात चाळीसहून अधिकजण मारले गेले. पण विमा उतरवला नसल्यामुळे हे दुकान एक महिनाभर बंद ठेवावं लागलं होतं आणि सारं नुकसान मालकांनाच भरावं लागलं. आता मुंबईतील हल्ल्यानंतर इथले दुकानदार आणि व्यापारीदेखील सतर्क झालेत. सध्या भारतात टेरर इन्श्युरन्स वेगळा असा मिळत नाही. उदाहरणार्थ आगीसाठी विमा काढताना त्यात टेरर कव्हर दिलं जातं. पण दहशतवादी कारवाया वाढतायत, त्यामुळे विमा कंपन्याही अशा प्रकारचा वेगळा विमा आणायचा विचार करतायत.इन्श्युरन्स रेग्युलेटरी अ‍ण्ड डेव्हलपमेंट अ‍थॉरिटीनं जनरल इन्श्युरन्स कंपन्यांना अशा विमा योजना मार्केटमध्ये आणायला मंजुरी दिलीय. त्यामुळे जीवन विम्याचाही खप वाढेल, असं कंपन्यांना वाटतंय. सध्या ओरिएंटल इन्श्युरन्स आणि न्यू इंडिया इन्श्युरन्सच्या टेरर इन्श्युरन्स पॉलिसीज उपलब्ध आहेत. वर्षाला फक्त शंभर रुपयांचा प्रिमियम भरुन पाच लाख रुपयांचा टेरर इन्श्युरन्स देणार्‍या योजना देखील आता मार्केटमध्ये येतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2008 06:06 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2008 06:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close