S M L

सीएसटीतील जखमींना मदतीचा हात दिला पण...

3 नोव्हेंबर, मुंबई 26 नोव्हेंबरला सीएसटी स्टेशनवर झालेल्या गोळीबारात जवळपास 55 लोक मारले गेले. गोळीबारानंतर स्टेशनवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आणि वेदनांनी विव्हळणारे जखमी लोक, असं हृदयद्रावक दृश्य होतं. या जखमींना आणि मृतदेहांना सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचं काम रेल्वेच्या पार्सल विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी केलं.सीएसटीत दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबार त्या दिवशी हरी शिळवणे यांनी पाहिला. हरी शिळवणे यांनी 26 नोव्हेंबरला दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेले मृतदेह वाहून नेले होते. सीएसटी स्टेशनवर अतिरेक्यांच्या गोळ्यांना बळी पडलेल्या दुदैर्वी लोकांना त्यांनी सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये पोहचवलं. त्यावेळी त्यात कोण जिवंत आहे आणि कोण नाही, हेही त्यांनी पाहिलं नाही. ' सुरुवातीला फटाके फुटाल्याप्रमाणे आवाज आला. नंतर कळालं फायरिंग सुरू आहे. आम्ही त्यांना पाहिलं. 15 मिनिटापर्यंत फायरिंग सुरू होतं. अतिरेकी गेल्यावर आम्ही जखमींना आम्ही तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेलं ' , असं शिळवणे सांगत होते.सीएसटीतील 13 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरुन दोन अतिरेकी गोळीबार करत या हॉलपर्यंत आले होते. त्यावेळी हरी शिळवणे आणि त्यांचे सहकारी त्यांच्या रुममध्ये होते. गोळ्यांचा आवाज ऐकून बाहेर येईपर्यंत हे अतिरेकी लोकल ट्रेनच्या दिशेनं गेले होते आणि या हॉलमध्ये काही वेळापूर्वी जिवंत असलेली माणसं निपचित पडली होती. हे सगळं बघून हे कर्मचारी बाहेर आले आणि त्यांच्या हातगाड्यांवर जमेल, तेवढ्यांना शेजारच्या सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये पोहचवलं. पण सीएसटी स्टेशनवर झालेल्या गोळीबारातील सर्व जखमींचा नंतर मृत्यू झाला. एवढं करुनही आपण त्यांना वाचवू शकलो नाही, ही खंत मात्र त्यांना आयुष्यभर राहील. माणुसकीला कोणताही धर्म नसतो. 26 नोव्हेंबरच्या हल्ल्यात सगळ्याच जातीधर्माचे लोक मारले गेले. पण कोणत्याही जातीधर्माचा विचार न करता त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहचवण्याचं काम केलं. त्यावेळी माणुसकी हा एकच धर्म त्यांच्यासाठी होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2008 03:30 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2008 03:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close