S M L

'वॉलमार्ट'साठी 125 कोटींचं लॉबिंग

10 डिसेंबरवॉलमार्टवरुन आता नवा वाद सुरू झालाय. वॉलमार्टला भारतात प्रवेश मिळावा म्हणून, वॉलमार्टनं अमेरिकेत लॉबिंगवर जवळपास 125 कोटी खर्च केल्याचं उघड झालंय. अमेरिकेतल्या खासदारांची मतं अनुकुल करण्यासाठी वॉलमार्टनं पैसे खर्च केलेत असा नुकताच सादर झालेल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. या मुद्द्यावरून आज राज्यसभेत भाजप आणि डाव्यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलीय.संसदेत थेट परकीय गुंतवणुकीच्या मुद्द्यावर विरोधकांचा पराभव झाला. पण सरकारनं गैरमार्गानं बहुमत मिळवल्याचा आरोप विरोधकांनी केला. या वादात आता आणखी तेल ओतलंय ते एफडीआयसंबंधीच्या एका खळबळजनक अहवालानं..भारतीय बाजार आपल्यासाठी खुला व्हावा, यासाठी वॉलमार्टनं अमेरिकेच्या सिनेटर्सकडे 125 कोटी रुपयांचं लॉबिंग केल्याची माहिती एका अहवालात देण्यात आलीय. यापैकी किती पैसा भारतात आला, असा सवाल आता विरोधक सरकारला विचारत आहेत.रविशंकर प्रसाद म्हणतात, वॉलमार्टनं लाच दिली हे आता स्पष्ट झालंय. भारतात लॉबिंगवर बंदी आहे. लाच देणं हा गुन्हा आहे. त्यामुळे वॉलमार्टविरोधात काय कारवाई करण्यात आली, हे भारताच्या जनतेला जाणून घ्यायचंय. या सर्व व्यवहारात दलाल कोण आहेत. त्यांचा तपास झाला पाहिजे. पंतप्रधानांनी याप्रकरणाची चौकशी का सुरू केली नाही, याचं उत्तर त्यांनी द्यायला हवंतर सीताराम येचुरी म्हणतात, वॉलमार्टनं ब्राझील आणि मेक्सिकोच्या बाजारात शिरण्यासाठीसुद्धा अशाच गैरमार्गांचा अवलंब केल्याची बातमी यावर्षाच्या सुरुवातीला न्यूयॉर्क टाईम्स या वर्तमानपत्रानं प्रसिद्ध केली होती. मायावतींनी राज्यसभेत आपल्या भूमिकेवरून घूमजाव करत सरकारच्या बाजूनं मतदान केलं. त्यामुळे भाजपनं मायावतींवरही टीका केली होती. मायावतीही भाजपवर टीका करण्याची संधी सोडत नाहीयत. थेट परकीय गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधकांना आणखी एक संधी मिळालीय. त्यामुळे बँकिंग आणि विमा क्षेत्रातल्या सुधारणांसारख्या महत्त्वाच्या आर्थिक सुधारणा राबवण्याचा मार्ग अधिक खडतर बनलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2012 09:31 AM IST

'वॉलमार्ट'साठी 125 कोटींचं लॉबिंग

10 डिसेंबर

वॉलमार्टवरुन आता नवा वाद सुरू झालाय. वॉलमार्टला भारतात प्रवेश मिळावा म्हणून, वॉलमार्टनं अमेरिकेत लॉबिंगवर जवळपास 125 कोटी खर्च केल्याचं उघड झालंय. अमेरिकेतल्या खासदारांची मतं अनुकुल करण्यासाठी वॉलमार्टनं पैसे खर्च केलेत असा नुकताच सादर झालेल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. या मुद्द्यावरून आज राज्यसभेत भाजप आणि डाव्यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलीय.

संसदेत थेट परकीय गुंतवणुकीच्या मुद्द्यावर विरोधकांचा पराभव झाला. पण सरकारनं गैरमार्गानं बहुमत मिळवल्याचा आरोप विरोधकांनी केला. या वादात आता आणखी तेल ओतलंय ते एफडीआयसंबंधीच्या एका खळबळजनक अहवालानं..भारतीय बाजार आपल्यासाठी खुला व्हावा, यासाठी वॉलमार्टनं अमेरिकेच्या सिनेटर्सकडे 125 कोटी रुपयांचं लॉबिंग केल्याची माहिती एका अहवालात देण्यात आलीय. यापैकी किती पैसा भारतात आला, असा सवाल आता विरोधक सरकारला विचारत आहेत.रविशंकर प्रसाद म्हणतात, वॉलमार्टनं लाच दिली हे आता स्पष्ट झालंय. भारतात लॉबिंगवर बंदी आहे. लाच देणं हा गुन्हा आहे. त्यामुळे वॉलमार्टविरोधात काय कारवाई करण्यात आली, हे भारताच्या जनतेला जाणून घ्यायचंय. या सर्व व्यवहारात दलाल कोण आहेत. त्यांचा तपास झाला पाहिजे. पंतप्रधानांनी याप्रकरणाची चौकशी का सुरू केली नाही, याचं उत्तर त्यांनी द्यायला हवंतर सीताराम येचुरी म्हणतात, वॉलमार्टनं ब्राझील आणि मेक्सिकोच्या बाजारात शिरण्यासाठीसुद्धा अशाच गैरमार्गांचा अवलंब केल्याची बातमी यावर्षाच्या सुरुवातीला न्यूयॉर्क टाईम्स या वर्तमानपत्रानं प्रसिद्ध केली होती. मायावतींनी राज्यसभेत आपल्या भूमिकेवरून घूमजाव करत सरकारच्या बाजूनं मतदान केलं. त्यामुळे भाजपनं मायावतींवरही टीका केली होती. मायावतीही भाजपवर टीका करण्याची संधी सोडत नाहीयत.

थेट परकीय गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधकांना आणखी एक संधी मिळालीय. त्यामुळे बँकिंग आणि विमा क्षेत्रातल्या सुधारणांसारख्या महत्त्वाच्या आर्थिक सुधारणा राबवण्याचा मार्ग अधिक खडतर बनलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2012 09:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close