S M L

विदर्भात वर्षभरात 100 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

15 डिसेंबरसरकारनं पॅकेजअंतर्गत विविध योजना राबवूनही विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. गव्हा इथले शेतकरी महादेव ढगे यांनी आजारपण आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. गेल्या 4 महिन्यांत 42 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात. आत्महत्यांचं प्रमाण यावर्षी वाढलंय. वर्धा जिल्ह्यात गेल्या वर्षी 91 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर यावर्षी 100 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचं आढळून आलंय. सततची नापिकी आणि त्यातून जडलेला आजार या चक्रातून शेतकरी हवालदिल झालाय. या हिवाळी अधिवेशवनात तरी नेते मंडळी शेतकरी आत्महत्येचा प्रश्न लावून धरतील का, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडलाय. आत्महत्या मात्र सुरूच2004 ते 2011 साली 7,974 शेतकर्‍यांच्या आत्महत्या 2004 साली 456 शेतकर्‍यांच्या आत्महत्या 2005 साली 666 शेतकर्‍यांच्या आत्महत्या ( पॅकेज जाहीर - 1,075 कोटी (राज्य))2006साली 1866 शेतकर्‍यांच्या आत्महत्या - पॅकेज जाहीर - 3,750 कोटी (केंद्र)2007 साली 1556 शेतकर्‍यांच्या आत्महत्या 2008 साली 1680 शेतकर्‍यांच्या आत्महत्या -पॅकेज जाहीर - 71,000 कोटी (केंद्र), पॅकेज जाहीर - 1,088 कोटी (राज्य)2009 साली 916 शेतकर्‍यांच्या आत्महत्या2010 साली 706 शेतकर्‍यांच्या आत्महत्या2011साली 128 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2012 02:27 PM IST

विदर्भात वर्षभरात 100 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

15 डिसेंबर

सरकारनं पॅकेजअंतर्गत विविध योजना राबवूनही विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. गव्हा इथले शेतकरी महादेव ढगे यांनी आजारपण आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. गेल्या 4 महिन्यांत 42 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात. आत्महत्यांचं प्रमाण यावर्षी वाढलंय. वर्धा जिल्ह्यात गेल्या वर्षी 91 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर यावर्षी 100 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचं आढळून आलंय. सततची नापिकी आणि त्यातून जडलेला आजार या चक्रातून शेतकरी हवालदिल झालाय. या हिवाळी अधिवेशवनात तरी नेते मंडळी शेतकरी आत्महत्येचा प्रश्न लावून धरतील का, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडलाय.

आत्महत्या मात्र सुरूच

2004 ते 2011 साली 7,974 शेतकर्‍यांच्या आत्महत्या 2004 साली 456 शेतकर्‍यांच्या आत्महत्या 2005 साली 666 शेतकर्‍यांच्या आत्महत्या ( पॅकेज जाहीर - 1,075 कोटी (राज्य))2006साली 1866 शेतकर्‍यांच्या आत्महत्या - पॅकेज जाहीर - 3,750 कोटी (केंद्र)2007 साली 1556 शेतकर्‍यांच्या आत्महत्या 2008 साली 1680 शेतकर्‍यांच्या आत्महत्या -पॅकेज जाहीर - 71,000 कोटी (केंद्र), पॅकेज जाहीर - 1,088 कोटी (राज्य)2009 साली 916 शेतकर्‍यांच्या आत्महत्या2010 साली 706 शेतकर्‍यांच्या आत्महत्या2011साली 128 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2012 02:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close