S M L

कोल्हापुरात कोट्यावधी रुपयांचे प्राण्यांचे अवशेष जप्त

18 डिसेंबरकोल्हापूर सांगली जिल्ह्यात सापाच्या विषाची तस्करी उघड झाली असतानाच कोल्हापूरमध्ये कोट्यवधी रुपयांचे प्राण्यांचे अवशेष जप्त करण्यात आले आहेत. वाघ , बिबट्या, चिंकारा, अस्वल, अशा वन्यप्राण्यांचे अवयव जप्त करण्यात आलेत. शहरातल्या जवाहरनगर भागात वनविभागानं ही कारवाई केली. त्यामुळे वन्यप्राण्यांची शिकार होत असून त्यांच्या अवयवांची तस्करी होत असल्याचंही उघड झालंय. याप्रकरणी मच्छिंद्र कोकणे आणि त्याचा मुलगा शिवराज कोकणे या दोघांना अटक करण्यात आली. दरम्यान, कोकणे यानं हे अवशेष कर्नल गायकवाड यांचे असल्याचं सांगितल्यानं या प्रकरणाला नवं वळण मिळाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 18, 2012 10:47 AM IST

कोल्हापुरात कोट्यावधी रुपयांचे प्राण्यांचे अवशेष जप्त

18 डिसेंबर

कोल्हापूर सांगली जिल्ह्यात सापाच्या विषाची तस्करी उघड झाली असतानाच कोल्हापूरमध्ये कोट्यवधी रुपयांचे प्राण्यांचे अवशेष जप्त करण्यात आले आहेत. वाघ , बिबट्या, चिंकारा, अस्वल, अशा वन्यप्राण्यांचे अवयव जप्त करण्यात आलेत. शहरातल्या जवाहरनगर भागात वनविभागानं ही कारवाई केली. त्यामुळे वन्यप्राण्यांची शिकार होत असून त्यांच्या अवयवांची तस्करी होत असल्याचंही उघड झालंय. याप्रकरणी मच्छिंद्र कोकणे आणि त्याचा मुलगा शिवराज कोकणे या दोघांना अटक करण्यात आली. दरम्यान, कोकणे यानं हे अवशेष कर्नल गायकवाड यांचे असल्याचं सांगितल्यानं या प्रकरणाला नवं वळण मिळाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2012 10:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close