S M L

जादूटोणा प्रतिबंधक विधेयक पुन्हा बारगळलं

18 डिसेंबरगेली अनेक वर्ष प्रलंबित असलेलं अनिष्ट प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक विधेयक पुन्हा बारगळलंय. गेल्या तीन अधिवेशानापासून हे विधेयक मांडलं जाणार अशाच बातम्या येताहेत पण प्रत्यक्षात या विधेयकाची प्रत तयार झालेली नाही. तसंच एकदा मांडलेलं कुठलंही विधेयक वर्षभराचा काळ उलटल्यानंतर ते बाद होतं. त्यासाठी विधेयकात दुरुस्ती करून ते नव्यानं विधानसभेत मांडण्याची गरज आहे. पण या प्रक्रियेस विलंब झालेला आहे अशी धक्काबादक माहिती समोर आलीय. सोमवारी विधानसभेत हे विधेयक मांडलं जाणार होतं. तसं कामकाज पत्रिकेत नमूदही करण्यात आलं होतं. पण विधेयकाचा मसुदाच तयार झाला नसल्यामुळं हे विधेयक मांडलं गेलं नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 18, 2012 10:55 AM IST

जादूटोणा प्रतिबंधक विधेयक पुन्हा बारगळलं

18 डिसेंबर

गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेलं अनिष्ट प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक विधेयक पुन्हा बारगळलंय. गेल्या तीन अधिवेशानापासून हे विधेयक मांडलं जाणार अशाच बातम्या येताहेत पण प्रत्यक्षात या विधेयकाची प्रत तयार झालेली नाही. तसंच एकदा मांडलेलं कुठलंही विधेयक वर्षभराचा काळ उलटल्यानंतर ते बाद होतं. त्यासाठी विधेयकात दुरुस्ती करून ते नव्यानं विधानसभेत मांडण्याची गरज आहे. पण या प्रक्रियेस विलंब झालेला आहे अशी धक्काबादक माहिती समोर आलीय. सोमवारी विधानसभेत हे विधेयक मांडलं जाणार होतं. तसं कामकाज पत्रिकेत नमूदही करण्यात आलं होतं. पण विधेयकाचा मसुदाच तयार झाला नसल्यामुळं हे विधेयक मांडलं गेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2012 10:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close