S M L

चौथरा हटवण्यास शिवसेना तयार

13 डिसेंबरशिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारांच्या जागी बांधण्यात आलेला चौथरा हटवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. हा चौथरा आजपासून हलवण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय. पण चौथरा शिवाजी पार्कातच राहील असंही त्यांनी म्हटलंय. यावरुन चौथर्‍याबाबत शिवेसेनेतच मतभेद असल्याचं दिसून येतंय. संजय राऊत आणि मनोहर जोशींसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा विरोध डावलून उद्धव ठाकरेंनी चौथरा हटवण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय. बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत कुठलंही विधान करुन नका अशा स्पष्ट सूचना दिल्यानंतरही, संजय राऊत आणि मनोहर जोशी यांनी वारंवार केलेल्या विधानांमळे स्मारकाबाबत वाद निर्माण झाला होता. त्याबाबत या दोन्ही नेत्यांना उद्धव यांनी फटकारल्याचंही सुत्रांनी सांगितलंय. दरम्यान, शिवाजी पार्कवरच बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ बनवणार असल्याचं सुभाष देसाईंनी स्पष्ट केलंय. तसंच यानंतर शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम राहणार असल्याचं स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2012 09:27 AM IST

चौथरा हटवण्यास शिवसेना तयार

13 डिसेंबर

शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारांच्या जागी बांधण्यात आलेला चौथरा हटवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. हा चौथरा आजपासून हलवण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय. पण चौथरा शिवाजी पार्कातच राहील असंही त्यांनी म्हटलंय. यावरुन चौथर्‍याबाबत शिवेसेनेतच मतभेद असल्याचं दिसून येतंय. संजय राऊत आणि मनोहर जोशींसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा विरोध डावलून उद्धव ठाकरेंनी चौथरा हटवण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय. बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत कुठलंही विधान करुन नका अशा स्पष्ट सूचना दिल्यानंतरही, संजय राऊत आणि मनोहर जोशी यांनी वारंवार केलेल्या विधानांमळे स्मारकाबाबत वाद निर्माण झाला होता. त्याबाबत या दोन्ही नेत्यांना उद्धव यांनी फटकारल्याचंही सुत्रांनी सांगितलंय. दरम्यान, शिवाजी पार्कवरच बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ बनवणार असल्याचं सुभाष देसाईंनी स्पष्ट केलंय. तसंच यानंतर शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम राहणार असल्याचं स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2012 09:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close