S M L

शिवाजी पार्कचं नामांतर शिवतीर्थ करा :शिवसेना

10 डिसेंबरशिवाजी पार्कला शिवतीर्थ हे नाव देण्यात यावं असा प्रस्ताव आज मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत चर्चेला येणार आहे. शिवसेना हा प्रस्ताव मांडणार आहेत. पण स्थायी समितीच्या बैठकीमध्ये काँग्रेस आणि मनसे हे दोघेही या प्रस्तावाला विरोध करणार आहेत. विकासाच्या मुद्द्यावर मनसे या प्रस्तावाला विरोध करणार असल्याचं मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी स्पष्ट केलंय. तर याबरोबरचं बाळासाहेबांवरील एक धडा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा अशी सूचनाही या प्रस्तावात करण्यात येणार असल्याचं कळतंय. त्यामुळे एकूणच शिवतीर्थ बाळासाहेबांवरील धडा आणि स्मारक अशा वेगवेगळ्या विषयांवरून स्थायी समितीत खडाजंगी होईल अशीच शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2012 09:42 AM IST

शिवाजी पार्कचं नामांतर शिवतीर्थ करा :शिवसेना

10 डिसेंबर

शिवाजी पार्कला शिवतीर्थ हे नाव देण्यात यावं असा प्रस्ताव आज मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत चर्चेला येणार आहे. शिवसेना हा प्रस्ताव मांडणार आहेत. पण स्थायी समितीच्या बैठकीमध्ये काँग्रेस आणि मनसे हे दोघेही या प्रस्तावाला विरोध करणार आहेत. विकासाच्या मुद्द्यावर मनसे या प्रस्तावाला विरोध करणार असल्याचं मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी स्पष्ट केलंय. तर याबरोबरचं बाळासाहेबांवरील एक धडा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा अशी सूचनाही या प्रस्तावात करण्यात येणार असल्याचं कळतंय. त्यामुळे एकूणच शिवतीर्थ बाळासाहेबांवरील धडा आणि स्मारक अशा वेगवेगळ्या विषयांवरून स्थायी समितीत खडाजंगी होईल अशीच शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2012 09:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close