S M L

जेष्ठ क्रिकेटपटू भाऊसाहेब निंबाळकर यांचे निधन

11 डिसेंबरभारतीय क्रिकेटमध्ये विक्रमांचा बादशहा हा किताब पटकावणार्‍या भाऊसाहेब निंबाळकर यांचं वृध्दापकाळानं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते 93 वर्षाचे होते. रणजीमध्ये त्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सर डॉन ब्रॅडमन यांचा नाबाद 452 रन्सचा विक्रम मोडण्याची संधी त्यांची हुकली होती. महाराष्ट्र विरुद्ध काथीवर मॅचमध्ये ते 443 वर नॉटआऊट होते. अशावेळी प्रतिस्पर्धी काथीवर संघाने लंचला पराभव मान्य केल्यामुळे निंबाळकर यांना हा विक्रम मोडता आला नव्हता. निंबाळकर यांच्या या खेळीची दखल तेव्हा साक्षात डॉन ब्रॅडमन यांनी घेतली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाऊसाहेब निंबाळकर यांचं कोल्हापूरमध्ये जाऊन अंत्यदर्शन घेतलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2012 01:47 PM IST

जेष्ठ क्रिकेटपटू भाऊसाहेब निंबाळकर यांचे निधन

11 डिसेंबर

भारतीय क्रिकेटमध्ये विक्रमांचा बादशहा हा किताब पटकावणार्‍या भाऊसाहेब निंबाळकर यांचं वृध्दापकाळानं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते 93 वर्षाचे होते. रणजीमध्ये त्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सर डॉन ब्रॅडमन यांचा नाबाद 452 रन्सचा विक्रम मोडण्याची संधी त्यांची हुकली होती. महाराष्ट्र विरुद्ध काथीवर मॅचमध्ये ते 443 वर नॉटआऊट होते. अशावेळी प्रतिस्पर्धी काथीवर संघाने लंचला पराभव मान्य केल्यामुळे निंबाळकर यांना हा विक्रम मोडता आला नव्हता. निंबाळकर यांच्या या खेळीची दखल तेव्हा साक्षात डॉन ब्रॅडमन यांनी घेतली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाऊसाहेब निंबाळकर यांचं कोल्हापूरमध्ये जाऊन अंत्यदर्शन घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2012 01:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close