S M L

शिवाजी पार्कवरचा चौथरा 17 तारखेला हलवणार

14 डिसेंबरशिवाजी पार्कमधल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाचा वाद अखेर मिटण्याची चिन्हं आहेत. शिवाजी पार्कमधला चौथरा हलवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलाय. 17 डिसेंबर म्हणजे येत्या सोमवारी हा चौथरा हटवण्यात येणार आहे. या चौथर्‍याबाबत महापालिकेनं शिवसेना नेत्यांना नोटीस बजावली होती. त्याला शिवसेनेनं आज उत्तर दिलंय. आणि 17 तारखेला चौथरा हलवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर दुसर्‍याच दिवशी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला. मात्र सरकारच्या कडक भूमिका आणि न्यायालयीन प्रविष्ठ खटल्यामुळे स्मारक महापौर बंगल्यात करण्यात ठरलंय मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे राज्य सरकारने महापौर सुनील प्रभू आणि सेनेचे खासदार संजय राऊत यांना नोटीस पाठवण्यात आली. दोन दिवसांपुर्वीच सेना नेत्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर सेनेची भूमिका मवाळ झाली. शिवतीर्थचा हट्टही शिवसेनेनं सोडला असून आता चौथरा हटवण्याबद्दल भूमिका जाहीर केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2012 01:37 PM IST

शिवाजी पार्कवरचा चौथरा 17 तारखेला हलवणार

14 डिसेंबर

शिवाजी पार्कमधल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाचा वाद अखेर मिटण्याची चिन्हं आहेत. शिवाजी पार्कमधला चौथरा हलवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलाय. 17 डिसेंबर म्हणजे येत्या सोमवारी हा चौथरा हटवण्यात येणार आहे. या चौथर्‍याबाबत महापालिकेनं शिवसेना नेत्यांना नोटीस बजावली होती. त्याला शिवसेनेनं आज उत्तर दिलंय. आणि 17 तारखेला चौथरा हलवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर दुसर्‍याच दिवशी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला. मात्र सरकारच्या कडक भूमिका आणि न्यायालयीन प्रविष्ठ खटल्यामुळे स्मारक महापौर बंगल्यात करण्यात ठरलंय मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे राज्य सरकारने महापौर सुनील प्रभू आणि सेनेचे खासदार संजय राऊत यांना नोटीस पाठवण्यात आली. दोन दिवसांपुर्वीच सेना नेत्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर सेनेची भूमिका मवाळ झाली. शिवतीर्थचा हट्टही शिवसेनेनं सोडला असून आता चौथरा हटवण्याबद्दल भूमिका जाहीर केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2012 01:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close