S M L

सिंचनावरील चर्चेची कोंडी फुटण्याची शक्यता

17 डिसेंबरनागपूर हिवाळी अधिवेशनात सिंचनाच्या चर्चेची कोंडी आज फुटण्याची शक्यता आहे. सिंचन घोटाळा आणि सिंचनाची श्‍वेतपत्रिका याबद्दल सरकार आपली भूमिका आजच स्पष्ट करेल असं निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केलं. गेला पूर्ण आठवडाभर सिंचनाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला त्यामुळे काहीच कामकाज होऊ शकलं नव्हतं. पण आता ही कोंडी फुटणार असल्यामुळे कामकाज पुढे जाऊ शकेल, असं दिसतंय. शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांना मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे तितकाच सरकारलाही आहे त्यामुळे वाद सोडून चर्चा करावी असा वडिलकीचा सल्ला पवार यांनी विरोधक आणि सत्ताधार्‍यांना दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2012 08:11 AM IST

सिंचनावरील चर्चेची कोंडी फुटण्याची शक्यता

17 डिसेंबर

नागपूर हिवाळी अधिवेशनात सिंचनाच्या चर्चेची कोंडी आज फुटण्याची शक्यता आहे. सिंचन घोटाळा आणि सिंचनाची श्‍वेतपत्रिका याबद्दल सरकार आपली भूमिका आजच स्पष्ट करेल असं निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केलं. गेला पूर्ण आठवडाभर सिंचनाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला त्यामुळे काहीच कामकाज होऊ शकलं नव्हतं. पण आता ही कोंडी फुटणार असल्यामुळे कामकाज पुढे जाऊ शकेल, असं दिसतंय. शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांना मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे तितकाच सरकारलाही आहे त्यामुळे वाद सोडून चर्चा करावी असा वडिलकीचा सल्ला पवार यांनी विरोधक आणि सत्ताधार्‍यांना दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2012 08:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close