S M L

शाहू महाराजांच्या स्मारकाला सरकारची तत्वत:मंजुरी

18 डिसेंबरकोल्हापुरमधल्या शाहू मिलच्या 27 एकर जागेवर राजर्षी शाहू महाराजांचं भव्य असे स्मारक उभारण्यास सरकारनं आज तत्वतः मंजुरी दिलीय. राजर्षी शाहू महाराजांनी या मिलची स्थापना केली होती. मात्र सराकरच्या अनास्थेमुळं ही मिल बंद पडली होती. 27 सप्टेंबर 1906 रोजी या मिलची सुरुवात झाली होती. मात्र 2003 साली या मिलचा अखेरचा भोंगा वाजला होता. त्यामुळं या बंद मिलच्या जागी शाहू महाराजांचं भव्य स्मारक व्हावं अशी तमाम शाहू प्रेमींची मागणी होती. यासाठी अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनीही आंदोलन केली होती. त्याला अखेर यश आलंय. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचं कोल्हापुरवासियांनी स्वागत केलं असून ठिकठिकाणी साखर वाटून आनंद साजरा करण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 18, 2012 02:47 PM IST

शाहू महाराजांच्या स्मारकाला सरकारची तत्वत:मंजुरी

18 डिसेंबर

कोल्हापुरमधल्या शाहू मिलच्या 27 एकर जागेवर राजर्षी शाहू महाराजांचं भव्य असे स्मारक उभारण्यास सरकारनं आज तत्वतः मंजुरी दिलीय. राजर्षी शाहू महाराजांनी या मिलची स्थापना केली होती. मात्र सराकरच्या अनास्थेमुळं ही मिल बंद पडली होती. 27 सप्टेंबर 1906 रोजी या मिलची सुरुवात झाली होती. मात्र 2003 साली या मिलचा अखेरचा भोंगा वाजला होता. त्यामुळं या बंद मिलच्या जागी शाहू महाराजांचं भव्य स्मारक व्हावं अशी तमाम शाहू प्रेमींची मागणी होती. यासाठी अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनीही आंदोलन केली होती. त्याला अखेर यश आलंय. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचं कोल्हापुरवासियांनी स्वागत केलं असून ठिकठिकाणी साखर वाटून आनंद साजरा करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2012 02:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close