S M L

प्रकल्पग्रस्तांचा तिलारी धरणाच्या कालव्यात ठिय्या

13 डिसेंबरसिंधुदुर्गातल्या तिलारी धरणावर गेल्या चार दिवसांपासून प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन सुरू केलंय. तिलारी धरणाच्या गोव्याकडे जाणार्‍या कालव्यात हे सगळे प्रकल्पग्रस्त उतरले आहे. आमच्या गेल्या 20 वर्षांपासून असलेल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत कालव्यातून हटणार नाही आणि गोव्याला पाणी सोडू देणार नाही असा इशारा या प्रकल्पग्रस्तांनी दिलाय. तिलारी धरणप्रकल्प हा गोवा आणि महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प असून काही प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन गोव्यातही झालेलं आहे. पण प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचं महाराष्ट्र शासनाने दिलेलं आश्वासन गेली 20 वर्ष झाली तरीसुद्धा एकाही प्रकल्पग्रस्ताला अजून नोकरी मिळालेली नाही यामुळे हे धरणग्रस्त संतापले आहे. आपल्या गाई - गुरांसह प्रकल्पग्रस्तांनी कालव्यातच आपला संसार मांडलाय. जोपर्यंत या बाबतीत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच रहाणार असल्याचं धरणग्रस्तांच्या समितीकडून स्पष्ट करण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2012 10:48 AM IST

प्रकल्पग्रस्तांचा तिलारी धरणाच्या कालव्यात ठिय्या

13 डिसेंबर

सिंधुदुर्गातल्या तिलारी धरणावर गेल्या चार दिवसांपासून प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन सुरू केलंय. तिलारी धरणाच्या गोव्याकडे जाणार्‍या कालव्यात हे सगळे प्रकल्पग्रस्त उतरले आहे. आमच्या गेल्या 20 वर्षांपासून असलेल्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत कालव्यातून हटणार नाही आणि गोव्याला पाणी सोडू देणार नाही असा इशारा या प्रकल्पग्रस्तांनी दिलाय. तिलारी धरणप्रकल्प हा गोवा आणि महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प असून काही प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन गोव्यातही झालेलं आहे. पण प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याचं महाराष्ट्र शासनाने दिलेलं आश्वासन गेली 20 वर्ष झाली तरीसुद्धा एकाही प्रकल्पग्रस्ताला अजून नोकरी मिळालेली नाही यामुळे हे धरणग्रस्त संतापले आहे. आपल्या गाई - गुरांसह प्रकल्पग्रस्तांनी कालव्यातच आपला संसार मांडलाय. जोपर्यंत या बाबतीत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच रहाणार असल्याचं धरणग्रस्तांच्या समितीकडून स्पष्ट करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2012 10:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close