S M L

संसदेवर हल्ल्याला 11 वर्ष पूर्ण, शहिदांना श्रद्धांजली

13 डिसेंबरसंसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज संसदेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी या हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान, या हल्ल्यातील दोषी अफजल गुरू याच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीचा मुद्दा भाजपनं संसदेत उचलला आणि फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला होत असलेल्या विलंबाबात प्रश्नोत्तराचा तास रद्द करुन चर्चेची मागणी केली. यानंतर प्रचंड गदारोळही झाला. संसदेच्या संरक्षणासाठी 9 जण शहिद झाले आणि त्या दिवशी गदारोळामुळे संसद ठप्प होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका लोकसभा अध्यक्षा मीराकुमार यांनी घेतली आणि गदारोळातच कामकाज सुरू केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2012 10:57 AM IST

संसदेवर हल्ल्याला 11 वर्ष पूर्ण, शहिदांना श्रद्धांजली

13 डिसेंबर

संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज संसदेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी या हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान, या हल्ल्यातील दोषी अफजल गुरू याच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीचा मुद्दा भाजपनं संसदेत उचलला आणि फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला होत असलेल्या विलंबाबात प्रश्नोत्तराचा तास रद्द करुन चर्चेची मागणी केली. यानंतर प्रचंड गदारोळही झाला. संसदेच्या संरक्षणासाठी 9 जण शहिद झाले आणि त्या दिवशी गदारोळामुळे संसद ठप्प होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका लोकसभा अध्यक्षा मीराकुमार यांनी घेतली आणि गदारोळातच कामकाज सुरू केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2012 10:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close