S M L

बायको समजून दुसर्‍याच महिलेवर पतीकडून चाकू हल्ला

17 डिसेंबरमुंबईतील दादर स्टेशनजवळ आपली पत्नी समजून दुसर्‍या एका महिलेवर चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. सकाळी नऊच्या सुमाराला दादर पूर्वेला असलेल्या स्वामिनारायण मंदिराजवळ ही घटना घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. या महिलेवर सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी हल्लेखोर विजय सांगळीकर (वय 35) याला अटक केली आहे. कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात हल्लेखोरानं दुसर्‍याच महिलेवर हल्ला केल्याचं पोलिसांनी सांगितलं. मुंबईतील दादर स्टेशन सगळ्यात वर्दळीचं ठिकाण याच गर्दीत सकाळी नऊच्या सुमाराला एका महिलेवर चाकू हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली. विजय सांगळीकर (वय 35) असं हल्लेखोराचं नाव आहे. सांवतवाडी येथील तो राहणार आहे. 2007 साली विजयचं लग्न झालं. मात्र लग्नानंतर पती-पत्नीमध्ये खटके उडायला लागले. विजयला 4 वर्षाचा एक मुलगा आहे. विजयच्या जाचाला कंटाळून त्याच्या पत्नीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती तसेच नुकसान भरपाईची मागणीही केली होती. पत्नीच्या या भूमिकेमुळे विजयच्या मनात तिच्या विरोधात घृणानिर्माण झाली होती. बदला घेण्याच्या भावनेनं विजय सुडाने पेटला होता. दरम्यान, विजयची पत्नी दादर येथे राहण्यासाठी आली होती. आज सकाळी नियमितपणे ती स्वामिनारायण मंदिराजवळील बस स्टॉपवर येत असते. ती येण्याअगोदर विजय बॅगेत कोयता घेऊन स्टॉपच्या परिसरात दबा धरून बसला होता. पण याच वेळी बस स्टॉपवर चॉर्टर अकाऊंटट सोनल लपाशिया (वय 25) ही स्कार्फ घालून उभी होती. सोनलने घातलेला स्कार्फ आणि विजयच्या पत्नीने घातलेला स्कॉर्फ एकसारखाच असल्यामुळे विजयने आपली पत्नी समजून त्याने सोनलवर हल्ला चढवला. कोयत्याने सपासपा वार करून तिला जखमी केलं. हा प्रकार घडताच आरडाओरडा सुरू झाला. घटनास्थळापासून पोलीस स्टेशनजवळच असल्यामुळे विजयला पकडण्यात आलं. सोनलला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आता तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे अशी माहिती अशी माहिती माटुंगा पोलीस स्टेशनचे अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2012 09:25 AM IST

बायको समजून दुसर्‍याच महिलेवर पतीकडून चाकू हल्ला

17 डिसेंबर

मुंबईतील दादर स्टेशनजवळ आपली पत्नी समजून दुसर्‍या एका महिलेवर चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. सकाळी नऊच्या सुमाराला दादर पूर्वेला असलेल्या स्वामिनारायण मंदिराजवळ ही घटना घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. या महिलेवर सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी हल्लेखोर विजय सांगळीकर (वय 35) याला अटक केली आहे. कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात हल्लेखोरानं दुसर्‍याच महिलेवर हल्ला केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

मुंबईतील दादर स्टेशन सगळ्यात वर्दळीचं ठिकाण याच गर्दीत सकाळी नऊच्या सुमाराला एका महिलेवर चाकू हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली. विजय सांगळीकर (वय 35) असं हल्लेखोराचं नाव आहे. सांवतवाडी येथील तो राहणार आहे. 2007 साली विजयचं लग्न झालं. मात्र लग्नानंतर पती-पत्नीमध्ये खटके उडायला लागले. विजयला 4 वर्षाचा एक मुलगा आहे. विजयच्या जाचाला कंटाळून त्याच्या पत्नीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती तसेच नुकसान भरपाईची मागणीही केली होती. पत्नीच्या या भूमिकेमुळे विजयच्या मनात तिच्या विरोधात घृणानिर्माण झाली होती. बदला घेण्याच्या भावनेनं विजय सुडाने पेटला होता. दरम्यान, विजयची पत्नी दादर येथे राहण्यासाठी आली होती. आज सकाळी नियमितपणे ती स्वामिनारायण मंदिराजवळील बस स्टॉपवर येत असते. ती येण्याअगोदर विजय बॅगेत कोयता घेऊन स्टॉपच्या परिसरात दबा धरून बसला होता. पण याच वेळी बस स्टॉपवर चॉर्टर अकाऊंटट सोनल लपाशिया (वय 25) ही स्कार्फ घालून उभी होती. सोनलने घातलेला स्कार्फ आणि विजयच्या पत्नीने घातलेला स्कॉर्फ एकसारखाच असल्यामुळे विजयने आपली पत्नी समजून त्याने सोनलवर हल्ला चढवला. कोयत्याने सपासपा वार करून तिला जखमी केलं. हा प्रकार घडताच आरडाओरडा सुरू झाला. घटनास्थळापासून पोलीस स्टेशनजवळच असल्यामुळे विजयला पकडण्यात आलं. सोनलला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आता तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे अशी माहिती अशी माहिती माटुंगा पोलीस स्टेशनचे अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2012 09:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close