S M L

डॉ.जयंत नारळीकरांना महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार

17 डिसेंबरमहाराष्ट्र फाऊंडेशनकडून दिले जाणारे प्रतिष्ठेचा पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. डॉ.जयंत नारळीकर यांना साहित्यासाठीचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर समाजकार्यासाठीचा जीवनगौरव पुरस्कार ठाकूरदासजी बंग यांना जाहीर झालाय. दोन लाख रूपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. तर बाळकृष्ण रेणके यांना समाजकार्यसाठी आणि माधव बावगे यांना प्रबोधन कार्यासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे.. याशिवाय बाळकृष्ण रेणके, आणि शिवाजी कागणीकर यांनाही त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल गौरवण्यात येणार आहे. साहित्य पुरस्कार करुणा गोखले, लीला आवटे, जयंत पवार आणि आनंद विंगकर यांना देण्यात येणार आहे. येत्या 5 जानेवारीला पुण्यात या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. अमेरिकेच्या महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांना हा पुरस्कार दिला जातो. आज पुण्यात नरेंद्र दाभोळकरांनी पत्रकार परिषद घेऊन हे पुरस्कार जाहीर केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2012 09:44 AM IST

डॉ.जयंत नारळीकरांना महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार

17 डिसेंबर

महाराष्ट्र फाऊंडेशनकडून दिले जाणारे प्रतिष्ठेचा पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. डॉ.जयंत नारळीकर यांना साहित्यासाठीचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर समाजकार्यासाठीचा जीवनगौरव पुरस्कार ठाकूरदासजी बंग यांना जाहीर झालाय. दोन लाख रूपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. तर बाळकृष्ण रेणके यांना समाजकार्यसाठी आणि माधव बावगे यांना प्रबोधन कार्यासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे.. याशिवाय बाळकृष्ण रेणके, आणि शिवाजी कागणीकर यांनाही त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल गौरवण्यात येणार आहे. साहित्य पुरस्कार करुणा गोखले, लीला आवटे, जयंत पवार आणि आनंद विंगकर यांना देण्यात येणार आहे. येत्या 5 जानेवारीला पुण्यात या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. अमेरिकेच्या महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांना हा पुरस्कार दिला जातो. आज पुण्यात नरेंद्र दाभोळकरांनी पत्रकार परिषद घेऊन हे पुरस्कार जाहीर केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2012 09:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close