S M L

पुण्यात 'पीएमपी' बसेसच्या टेंडरमध्ये घोळ, सर्व टेंडर रद्द

18 डिसेंबरपुण्यात खासगी बसेस पीएमपीला भाडेतत्वावर देण्यासाठी भरलेल्या टेंडरमध्ये कॉन्ट्रॅक्टर्सनी संगनमत केल्याचं उघड झालंय. त्यामुळे आता हे सगळे टेंडर रद्द करण्याचा निर्णय पीएमपीएमएलच्या प्रशासनाने घेतला आहे. मात्र नुसते हे कॉन्ट्रॅक्ट रद्द न करता या सगळया कॉन्ट्रॅक्टर्सना ब्लॅकलिस्ट करावं अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी केली आहे. पीएम 250 बसेस खासगी बसचालकांकडून भाडेतत्वावर घेते. पण जुना करार संपत आल्यानं नव्यानं निविदा मागवण्यात आल्या होत्या. पण एकसारख्या किंमतीचे आणि दुप्पट दराच्या निविदा दाखल करण्यात आल्या होत्या. पीएमपीच्या मालकीच्या बसेस शिवाय जवळपास 250 पीएमपी खासगी बसचालकांकडून भाडेतत्वावर घेत असते. त्यासाठीचं जुन कॉन्ट्रॅक्ट संपत असल्याने पीेएमपीतर्फे नव्याने निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र कॉन्ट्रॅक्टर्स कडून एकसारख्या किंमतीचे आणि सध्याच्या दराच्या दुप्पट दराच्या निविदा दाखल करण्यात आल्या. सगळ्या निविदा अशा दराने आल्यामुळे त्या रिंग करुन भरल्या गेल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे या सर्व निविदा रद्द करण्यात आल्या आहेत अशी माहिती पीएमपीचे सहसंचालक प्रवीण अष्टीकर यांनी दिली. पुणेकरांना आत्ताच पीएमपी बसेस कमी पडत आहे. जर निविदांचा हा घोळ असाच कायम राहिला तर नेमकं काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 18, 2012 05:09 PM IST

पुण्यात 'पीएमपी' बसेसच्या टेंडरमध्ये घोळ, सर्व टेंडर रद्द

18 डिसेंबर

पुण्यात खासगी बसेस पीएमपीला भाडेतत्वावर देण्यासाठी भरलेल्या टेंडरमध्ये कॉन्ट्रॅक्टर्सनी संगनमत केल्याचं उघड झालंय. त्यामुळे आता हे सगळे टेंडर रद्द करण्याचा निर्णय पीएमपीएमएलच्या प्रशासनाने घेतला आहे. मात्र नुसते हे कॉन्ट्रॅक्ट रद्द न करता या सगळया कॉन्ट्रॅक्टर्सना ब्लॅकलिस्ट करावं अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे यांनी केली आहे.

पीएम 250 बसेस खासगी बसचालकांकडून भाडेतत्वावर घेते. पण जुना करार संपत आल्यानं नव्यानं निविदा मागवण्यात आल्या होत्या. पण एकसारख्या किंमतीचे आणि दुप्पट दराच्या निविदा दाखल करण्यात आल्या होत्या. पीएमपीच्या मालकीच्या बसेस शिवाय जवळपास 250 पीएमपी खासगी बसचालकांकडून भाडेतत्वावर घेत असते. त्यासाठीचं जुन कॉन्ट्रॅक्ट संपत असल्याने पीेएमपीतर्फे नव्याने निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र कॉन्ट्रॅक्टर्स कडून एकसारख्या किंमतीचे आणि सध्याच्या दराच्या दुप्पट दराच्या निविदा दाखल करण्यात आल्या. सगळ्या निविदा अशा दराने आल्यामुळे त्या रिंग करुन भरल्या गेल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे या सर्व निविदा रद्द करण्यात आल्या आहेत अशी माहिती पीएमपीचे सहसंचालक प्रवीण अष्टीकर यांनी दिली. पुणेकरांना आत्ताच पीएमपी बसेस कमी पडत आहे. जर निविदांचा हा घोळ असाच कायम राहिला तर नेमकं काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2012 05:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close