S M L

हुंड्यासाठी अडून बसलेल्या नवरदेवाला नवरीनंच चोपलं

17 डिसेंबर'आधी हुंडा, मग लग्न' असा हट्ट धरून बसणार्‍या नवरदेवाला नववधूकडून चांगलाच मार खावा लागला. एवढेच नाहीतर वधुकडील मंडळीने हुंड्याच्या लालची नवरदेवाची थेट पोलीस स्टेशनापर्यंत वरात काढली. डोंबिवलीत ही घटना घडली. डोबिंवलीत राहणार्‍या अमृता साळुंखे हिचं काम्प्युटर इंजिनिअर असलेल्या प्रवीण बनेशी लग्न जमलं होतं. विशेष म्हणजे या दोघांचा हा प्रेमविवाह होता. मात्र लग्नविधी सुरू होण्याअगोदर प्रवीणने अचानक 2 लाख रूपये द्या तरच बोहल्यावर चढेन असा पवित्रा घेतला. त्याचा हा पवित्रा बघून ह्या तरूणीने भर लग्नसोहळ्यातच प्रवीण बनेला चांगलाच चोप दिला. या दोघांचा साखरपुडाही झाला होता. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या तरीही या उच्चशिक्षित मुलाने लग्नाच्या दिवशी हुंड्याची मागणी केली. अखेर मुलीकडच्या नातेवाईकांनी प्रवीण बनेला चोप देत त्याची वरात विष्णुनगर पोलीस स्टेशनपर्यंत काढली. पोलिसांनी फसवणूक व हुंडाविरोधी कायद्यातंर्गत प्रवीण बने विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे व त्याला ताब्यात घेतलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2012 09:58 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2012 09:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close