S M L

गुजरातचं भवितव्य मतपेटीत बंद

17 डिसेंबरगुजरातमध्ये आज झालेल्या दुसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यात 70 टक्के मतदान झालं. मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनीही आज मतदानाचा हक्क बजावला. पण यावेळी मोदींबरोबर शेकडो कार्यकर्ते होते. त्यामुळे काँग्रेसनं मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केलीय. दरम्यान, मोदींनी सोनिया गांधी यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं वक्तव्यही केलंय. त्याविरोधातही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आलीय. मणिनगर मतदारसंघातून मोदींविरोधात निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट यांच्या पत्नी श्‍वेता भट काँग्रेसतर्फे उभ्या आहेत. आज एकूण 95 जागांसाठी मतदान झालं. यातला मध्य आणि उत्तर गुजरातमधला शहरी भाग हा भाजप समर्थक मानला जातो. पण त्याचबरोबर आदिवासीबहुल भागातल्या मतदानाकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. पहिल्या टप्प्यात मोदी,काँग्रेस आणि केशुभाई पटेल यांच्यात तिरंगी लढत होती.तर दुसर्‍या टप्प्यात मोदी विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे. 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. दुसर्‍या टप्प्यात मतदानाला गालबोटपण आज निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात मतदानादरम्यान हिंसाही घडली. पंचमहाल जिल्ह्यात झालेल्या गोळीबारात भाजपचे उमेदवार जेठा भरवाड हे जखमी झालेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्याच कार्यकर्त्यांनी हा गोळीबार केला. या गोळीबारात तीन जण जखमी आहेत. यात जेठा भरवाड यांचा समावेश आहे. भरवाड हे मोदींचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जातात.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2012 01:20 PM IST

गुजरातचं भवितव्य मतपेटीत बंद

17 डिसेंबर

गुजरातमध्ये आज झालेल्या दुसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यात 70 टक्के मतदान झालं. मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनीही आज मतदानाचा हक्क बजावला. पण यावेळी मोदींबरोबर शेकडो कार्यकर्ते होते. त्यामुळे काँग्रेसनं मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केलीय. दरम्यान, मोदींनी सोनिया गांधी यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं वक्तव्यही केलंय. त्याविरोधातही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आलीय. मणिनगर मतदारसंघातून मोदींविरोधात निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट यांच्या पत्नी श्‍वेता भट काँग्रेसतर्फे उभ्या आहेत. आज एकूण 95 जागांसाठी मतदान झालं. यातला मध्य आणि उत्तर गुजरातमधला शहरी भाग हा भाजप समर्थक मानला जातो. पण त्याचबरोबर आदिवासीबहुल भागातल्या मतदानाकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. पहिल्या टप्प्यात मोदी,काँग्रेस आणि केशुभाई पटेल यांच्यात तिरंगी लढत होती.तर दुसर्‍या टप्प्यात मोदी विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे. 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

दुसर्‍या टप्प्यात मतदानाला गालबोटपण आज निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात मतदानादरम्यान हिंसाही घडली. पंचमहाल जिल्ह्यात झालेल्या गोळीबारात भाजपचे उमेदवार जेठा भरवाड हे जखमी झालेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्याच कार्यकर्त्यांनी हा गोळीबार केला. या गोळीबारात तीन जण जखमी आहेत. यात जेठा भरवाड यांचा समावेश आहे. भरवाड हे मोदींचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2012 01:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close