S M L

93 व्या नाट्यसंमेलनाला 'पवार'मय सुरूवात

22 डिसेंबरबारामतीत 93 व्या नाट्यसंमेलनाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं.तर पुतणे अजित पवार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. यावेळी बोलतांना संमेलनाध्यक्ष मोहन आगाशे यांनी नाट्यसंस्कृती आणखी मजबूत करण्याची आवश्यकता व्यक्त केली. तर यावेळी अजित पवार यांनी नाट्य परिषदेवर थेट टीका केली. निधी देऊनही नाट्य परिषद आराखडा सादर करत नाही याबाबत अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे 93 वं नाट्यसंमेलन शरद पवारांच्या जन्मभूमी बारामतीत भरवण्यात आल्यामुळे या संमेलनाला 'पवार'मय रुप मिळालंय. संमेलन आणि राजकारण गेल्या वर्षांपासून गणित मांडलं गेलं. राजकारण्याचा संमेलनात शिरकावर अनेक साहित्यकांना पचनी पडला नाही. जेष्ठ साहित्यकांनी याबद्दल नाराजी बोलून दाखवली होती. याच संमेलनाचे अध्यक्ष मोहन आगाशे यांनीही संमेलनध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आयबीएन लोकमतशी बोलताना साहित्य संमेलनात राजकारणी नको असं मत व्यक्त केलं होतं. बारामती भरलेल्या संमेलनाच्या होर्डिंगपासून ते पत्रिका,सभागृहापर्यंत सर्व काही 'पवार'मय रूप पाहायला मिळालं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 22, 2012 11:29 AM IST

93 व्या नाट्यसंमेलनाला 'पवार'मय सुरूवात

22 डिसेंबर

बारामतीत 93 व्या नाट्यसंमेलनाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं.तर पुतणे अजित पवार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. यावेळी बोलतांना संमेलनाध्यक्ष मोहन आगाशे यांनी नाट्यसंस्कृती आणखी मजबूत करण्याची आवश्यकता व्यक्त केली. तर यावेळी अजित पवार यांनी नाट्य परिषदेवर थेट टीका केली. निधी देऊनही नाट्य परिषद आराखडा सादर करत नाही याबाबत अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे 93 वं नाट्यसंमेलन शरद पवारांच्या जन्मभूमी बारामतीत भरवण्यात आल्यामुळे या संमेलनाला 'पवार'मय रुप मिळालंय. संमेलन आणि राजकारण गेल्या वर्षांपासून गणित मांडलं गेलं. राजकारण्याचा संमेलनात शिरकावर अनेक साहित्यकांना पचनी पडला नाही. जेष्ठ साहित्यकांनी याबद्दल नाराजी बोलून दाखवली होती. याच संमेलनाचे अध्यक्ष मोहन आगाशे यांनीही संमेलनध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आयबीएन लोकमतशी बोलताना साहित्य संमेलनात राजकारणी नको असं मत व्यक्त केलं होतं. बारामती भरलेल्या संमेलनाच्या होर्डिंगपासून ते पत्रिका,सभागृहापर्यंत सर्व काही 'पवार'मय रूप पाहायला मिळालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2012 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close