S M L

इंग्लंडविरुध्दच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा

4 डिसेंबर इंग्लंड विरुद्धच्या दोन टेस्टसाठी भारतीय टीमची निवड चेन्नईत करण्यात आली. प्रज्ञान ओझा आणि युवराज सिंगला अपेक्षेप्रमाणेच टीममध्ये घेण्यात आलंय तर रुद्रप्रताप सिंगला वगळण्यात आलंय. इंग्लंडबरोबरची पहिली टेस्ट येत्या अकरा तारखेला चेन्नईत होणार आहे. ऑस्ट्रेलियाबरोबर झालेल्या टेस्ट सिरिजनंतर सौरव गांगुली रिटायर्ड झाला. त्याच्या जागी आता लेफ्ट हँडेड बॅट्समन युवराज सिंगला संधी देण्यात आली आहे. इंग्लंड विरुद्धच्या वन डे सिरीजमध्ये लागोपाठ दोन सेंच्युरीज फटकावल्यानंतर युवराजची निवड अपेक्षित होतीच. एम. विजयच्या जागी चेतेश्वर पूजाराला संधी देण्यात येईल असं म्हटलं जात होतं. चेतेश्वर पूजारानं रणजी ट्रॉफीत दोन डबल सेंच्युरीज ठोकल्या होत्या. पण निवड समितीनं विनिंग कॉम्बिनेशन कायम ठेवलंय.अशी आहे भारतीय टेस्ट टीमविरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर, व्ही.व्ही. एस. लक्ष्मण, राहुल द्रविड, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोणी (कॅप्टन), एम. विजय, हरभजन सिंग, एस.बद्रीनाथ, मुनाफ पटेल, अमित मिश्रा, झहीर खान, इशांत शर्मा आणि प्रज्ञान ओझा

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2008 12:07 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2008 12:07 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close