S M L

हा विजय गुजरातच्या जनतेचा -मोदी

20 डिसेंबरगुजरातच्या जनतेनं तिसर्‍यांदा मला निवडून दिल्याबद्दल मनपुर्वक आभारी आहे पण हा विजय जनतेचा आहे. ज्यांना सुशासन हवं आहे अशा जनतेचा विजय आहे. हा विजय माझा नसून पक्षाचा आणि तुमचा विजय आहे. जनतेनं सिद्ध करून दाखवलंय खरं काय आणि खोटं काय, जनतेनं भविष्याचा वेध घेऊन कौल दिलाय अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी मतदारराजाचे आभार मानले. त्याचबरोबर माझ्या हातून काही चूका झाल्या असतील तर मला माफ करा आणि यापुढे चुका होणार नाहीत यासाठीही आशिर्वाद द्या असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं. तसंच मी थांबणार नाही मी थकणार नाही. मला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं. तुम्ही मला जिंकलं आता तुम्हाला जिंकण्यासाठी मी प्रयत्न करणार यासाठी येणारी पाच वर्षही गुजरातच्या विकासाठी माझं आयुष्य समर्पित राहील अशी हमी मोदींनी गुजरातच्या जनतेला दिली. तसंच टीकाकारांना माझा विजय पचवला जात नाहीये त्यांना रात्री शांत झोप लागावी यासाठी मी पार्थना करतो अशा शेलक्या शब्दात टोलाही लगावला. अहमदाबादमध्ये मोदींची जाहीर विजयी सभा झाली यावेळे ते बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2012 03:31 PM IST

हा विजय गुजरातच्या जनतेचा -मोदी

20 डिसेंबर

गुजरातच्या जनतेनं तिसर्‍यांदा मला निवडून दिल्याबद्दल मनपुर्वक आभारी आहे पण हा विजय जनतेचा आहे. ज्यांना सुशासन हवं आहे अशा जनतेचा विजय आहे. हा विजय माझा नसून पक्षाचा आणि तुमचा विजय आहे. जनतेनं सिद्ध करून दाखवलंय खरं काय आणि खोटं काय, जनतेनं भविष्याचा वेध घेऊन कौल दिलाय अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी मतदारराजाचे आभार मानले. त्याचबरोबर माझ्या हातून काही चूका झाल्या असतील तर मला माफ करा आणि यापुढे चुका होणार नाहीत यासाठीही आशिर्वाद द्या असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं. तसंच मी थांबणार नाही मी थकणार नाही. मला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं. तुम्ही मला जिंकलं आता तुम्हाला जिंकण्यासाठी मी प्रयत्न करणार यासाठी येणारी पाच वर्षही गुजरातच्या विकासाठी माझं आयुष्य समर्पित राहील अशी हमी मोदींनी गुजरातच्या जनतेला दिली. तसंच टीकाकारांना माझा विजय पचवला जात नाहीये त्यांना रात्री शांत झोप लागावी यासाठी मी पार्थना करतो अशा शेलक्या शब्दात टोलाही लगावला. अहमदाबादमध्ये मोदींची जाहीर विजयी सभा झाली यावेळे ते बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2012 03:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close