S M L

पुण्याचे आयुक्त झुरमुरे यांच्या वक्तव्यावरून वादंग

17 डिसेंबरपुणेकरांचा पाण्याचा प्रश्न नेहमी वादात राहीला आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांनी या वादात आणखी तेल ओतलंय. पाण्याच्या बाबतीत पुणेकर माजलेले आहेत अशी वादग्रस्त टीका त्यांनी एका जाहीर सभेत केली होती. या वक्तव्याचे तीव्र पडसाद पुण्यात उमटू लागले आहे. नरेश झुरमुरे यांनी माफी मागवी अशी मागणी सर्वच पक्षांनी केलीय. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी झुरमुरे यांच्या खुर्चीला चपलांचा हार घालत निषेध व्यक्त केला. तर मनसेनं झुरमुरेंच्या पुतळयाचं दहन करुन आपला संताप व्यक्त केला. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही या व्यक्तव्याचे पडसाद उमटले. भाजप, शिवसेना आणि मनसेनं सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे पुणेकरांच्या पाणी वापरावर झुरमुरेंनी केली टीका योग्य असल्याचं सांगत सामाजिक संघटनांनी झुरमुरेंना पाठिंबा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2012 02:42 PM IST

पुण्याचे आयुक्त झुरमुरे यांच्या वक्तव्यावरून वादंग

17 डिसेंबर

पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न नेहमी वादात राहीला आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांनी या वादात आणखी तेल ओतलंय. पाण्याच्या बाबतीत पुणेकर माजलेले आहेत अशी वादग्रस्त टीका त्यांनी एका जाहीर सभेत केली होती. या वक्तव्याचे तीव्र पडसाद पुण्यात उमटू लागले आहे. नरेश झुरमुरे यांनी माफी मागवी अशी मागणी सर्वच पक्षांनी केलीय. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी झुरमुरे यांच्या खुर्चीला चपलांचा हार घालत निषेध व्यक्त केला. तर मनसेनं झुरमुरेंच्या पुतळयाचं दहन करुन आपला संताप व्यक्त केला. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही या व्यक्तव्याचे पडसाद उमटले. भाजप, शिवसेना आणि मनसेनं सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे पुणेकरांच्या पाणी वापरावर झुरमुरेंनी केली टीका योग्य असल्याचं सांगत सामाजिक संघटनांनी झुरमुरेंना पाठिंबा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2012 02:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close