S M L

शिवरायांच्या 'त्या' पत्रावरून वाद

25 डिसेंबरपुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाला सापडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या पत्रामुळं नव्या वादाला सुरूवात झालीय. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संशोधकांनी एका समाजाला हेतूपुरस्पर बदनाम करण्याकरिता या पत्राला पुन्हा प्रसिध्दी देण्याचा खटाटोप केल्याचा आरोप आज शिवप्रेमी मंडळाचे सदस्य इतिहास संशोधक अनंत दारवटकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. शिवाजी महाराजाच्या पत्रामध्ये रांजेगावच्या मुकादमाला लिहीलेल्या पत्रामध्ये पाटील व मराठा असा शब्दच नाही आहे. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संशोधकांनी मराठा समजाला हेतूपुरस्पर बदनाम करण्याकरिता या पत्राला पुन्हा प्रसिध्दी देण्याचा खटाटोप केलाय असा आरोप शिवप्रेमी मंडळाच्या वतीनं करण्यात आला आहे. शिवाजी महाराजांचं एक दुर्मिळ पत्रं भारत इतिहास संशोधक मंडळाच्या दफ्तरात सापडलंय. हे पत्र अस्स्ल असून यावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. शिवाजी महाराजाचं हे पत्र 1929मध्ये मंडळातल्या स. गं. जोशी यांना मिळालं होतं. त्यानंतर मंडळानं या पत्रातला मजकूर 1930 मध्ये शिवचरीत्र - साहित्य खंड 2 मध्ये प्रकाशित केला. त्यानंतर मात्र 1930 मध्ये हे पत्र गहाळ झालं होतं. तब्बल 82 वर्षांनंतर हे पत्र भारत इतिहास संशोधक मंडळाच्या दफ्तरात सापडलं आहे. शिवाजी महाराजांनी हे पत्र 1664 मध्ये लिहिलेला आहे. खेड गावचा मोकदम भिकाजी गूजर यांना शिवाजी महाराजांनी हे पत्र लिहिलं होतं. रांजेगावच्या पाटलानं महिलेशी गैरवर्तन केल्यानं शिवाजी महारांजांनी त्याचे हात पाय तोडले, हा प्रसंग या पत्रात नमूद केलाय.संबंधित बातम्या (पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा)तब्बल 82 वर्षांनंतर शिवरायांचं दुर्मिळ पत्र सापडलं (व्हिडिओ)

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 25, 2012 03:53 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 25, 2012 03:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close