S M L

पुणे बॉम्बस्फोट प्रकरणी 4 दहशतवादी एटीएसच्या ताब्यात

27 डिसेंबरपुण्यात 1 ऑगस्ट 2012 रोजी जंगली महाराज रोडवर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी महाराष्ट्र एटीएसनं चार दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांकडून ताब्यात घेतलंय. इरफान लांडगे, फिरोज सय्यद, असद खान, इम्रान खान अशी या दहशतवाद्यांची नावं आहेत. या सर्व दहशदवाद्यांना औरंगाबाद जिल्ह्यातील सय्यद आरिफ याच्या घरी बॉम्ब बनवण्याचं ट्रेनिंग देण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी पुण्यात चार स्पोट घडवून आणले होते. दहशतवाद्यांनी आणखी दोन बॉम्ब बनवले होते. पण त्यापैकी एक बॉम्ब फुटला नाही तर दुसरा पोलिसांनी फुटन्याआधीच ताब्यात घेऊन निकामी केला. या सर्व दहशतवाद्यांना आज एटीएसने कोर्टात सादर केल्यानंतर त्यांना 1 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 27, 2012 03:55 PM IST

पुणे बॉम्बस्फोट प्रकरणी 4 दहशतवादी एटीएसच्या ताब्यात

27 डिसेंबर

पुण्यात 1 ऑगस्ट 2012 रोजी जंगली महाराज रोडवर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी महाराष्ट्र एटीएसनं चार दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांकडून ताब्यात घेतलंय. इरफान लांडगे, फिरोज सय्यद, असद खान, इम्रान खान अशी या दहशतवाद्यांची नावं आहेत. या सर्व दहशदवाद्यांना औरंगाबाद जिल्ह्यातील सय्यद आरिफ याच्या घरी बॉम्ब बनवण्याचं ट्रेनिंग देण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी पुण्यात चार स्पोट घडवून आणले होते. दहशतवाद्यांनी आणखी दोन बॉम्ब बनवले होते. पण त्यापैकी एक बॉम्ब फुटला नाही तर दुसरा पोलिसांनी फुटन्याआधीच ताब्यात घेऊन निकामी केला. या सर्व दहशतवाद्यांना आज एटीएसने कोर्टात सादर केल्यानंतर त्यांना 1 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2012 03:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close